गायकवाड यांना पी एचडी प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गायकवाड यांना पी एचडी प्रदान
गायकवाड यांना पी एचडी प्रदान

गायकवाड यांना पी एचडी प्रदान

sakal_logo
By

33239

गायकवाड यांना
पीएच.डी. प्रदान
इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील प्रा. व्ही. पी. गायकवाड यांना शिवाजी विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजीअंतर्गत पीएच.डी. इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनी ‘स्टडी ऑफ फ्ल्युईड फ्लो अँड हीट ट्रान्सफर इन मायक्रोचॅनेल हीट सिंक फॉर मोनोलिथीक चिप कुलिंग अ‍ॅप्लिकेशन’ या विषयावर प्रबंध पूर्ण केला आहे.
सततच्या विद्युत प्रवाहामुळे इलेक्ट्रॉनिक्स पार्टस्‌ची उष्णता वाढते. ही उष्णता बाहेर न काढता येणे हा इलेक्ट्रॉनिक्स पार्टस फेल होण्यामागचे एक प्रमुख कारण आहे. ‘मायक्रोचॅनेल हीट सिंक’ ही पद्धती वाढलेली उष्णता दूर करण्यासाठी वापरली जाते. संशोधनासाठी एआयसीटीई, न्यू दिल्लीकडून रिसर्च प्रमोशन स्किम अंतर्गत १४ लाख रुपये मंजूर झाले होते. या कामासाठी पेटेंट इंडिया ऑफिसकडून पेटंट मिळालेले आहे. संशोधनासाठी प्रा. डॉ. सुहास मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73591 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..