रेल्वेच्या आरपीएफ विभागाची रॅली संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेच्या आरपीएफ विभागाची रॅली संपन्न
रेल्वेच्या आरपीएफ विभागाची रॅली संपन्न

रेल्वेच्या आरपीएफ विभागाची रॅली संपन्न

sakal_logo
By

३३२६३

रेल्वेच्या सुरक्षा दलातर्फे रॅली
कोल्हापूर, ता. २ ः येत्या १५ ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने रेल्वे संरक्षण दलातर्फे (आरपीएफ) आज शहरातून दुचाकी आणि मोटारीची रॅली काढली. ठाणे आणि कोल्हापूरचे निरीक्षक विजय शंकर मांझी यांच्या उपस्थितीत ही रॅली काढून स्वतंत्र्य अमृत महोत्सव साजरा कला. रेल्वे सुरक्षा दिलाचे प्रमुख संजय चन्दर, सहासंचालक अजय सादानी, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार यांच्या आदेशानुसार आजादी का अमृत महोत्सव एक जुलै पासून साजरा करण्यात येत आहे. याचे औचित्य साधून ही रॅली काढण्यात आली. यावेळी
पुणे विभागाचे सहायक विभागीय अभियंता आर. के. यादव, कोल्हापूर स्थानकाचे अधीक्षक विजय कुमार, सहाय्यक उपनिरीक्षक विजय पार्टे यांच्यासह दलातील कर्मचारी संजय कांबळे, रमेश टोमके, शरद कांबळे, शिवाजी नरुटे, एल. टी. गुरव, डी. बी. पाटील तसेच १०९८ चाइल्ड हेल्प लाइनचे अधिकारी आणि कर्माचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73599 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top