जनावरांसाठी जंतनिर्मूलन सप्ताहाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनावरांसाठी जंतनिर्मूलन सप्ताहाचे आयोजन
जनावरांसाठी जंतनिर्मूलन सप्ताहाचे आयोजन

जनावरांसाठी जंतनिर्मूलन सप्ताहाचे आयोजन

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...


जिल्ह्यात जनावरांसाठी
जंतनिर्मूलन कार्यक्रम
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २ : आझादी का अमृतमहोत्सव वर्षाचे औचित्य साधून व राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्ह्यात जनावरांसाठी जंतनिर्मूलन सप्ताहाचे आयोजन केले आहे. पशुपालकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांनी केले. जिल्‍ह्यात गाय, म्‍हैस, शेळी, मेंढ्या अशा एकूण पशुधनाची संख्या १३ लाख आहे. ७ जुलैपर्यंत जंतनिर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
जिल्‍ह्यात म्‍हैसवर्गीय ५ लाख ६८ हजार ८८४ तर गायवर्गीय जनावरांची संख्या २ लाख ८३ हजार ६३७ आहे. शेळ्या आणि मेंढ्यांची संख्याही लक्षणीय आहे. या जनावरांमध्ये जंत प्रादुर्भाव झाल्यामुळे जनावरांचे वजन वाढत नाही, वासरांमध्ये मर्तुक होते. जनावरांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जनावरे आजारी पडतात. आहारातील पोषण मूल्यांपैकी २० ते ३० टक्के परजिवी जंत खातात. कुपोषणामुळे जनावरे व्यवस्थित माजावर येत नाहीत, तसेच उत्पादनक्षमता घटते. परिणामी पशुपालन तोट्यात जातो.
नियमित जंतनिर्मूलनामुळे वासरांतील मर्तुक कमी होते. जनावरांची वाढ व्यवस्थित होते. जनावरे व्यवस्थित माजावर येतात. त्यामुळे दुग्धोत्पादन वाढते. त्वचेचे आजार कमी होतात. केसांची चमक वाढून केस दाट होतात, त्यामुळे त्वचा निरोगी राहते. जनावरे योग्य वेळी माजावर आल्यामुळे गाभण राहाणेचे प्रमाण वाढून जनावरांतील भाकड काळ कमी होतो.
जंत निर्मूलनाचे फायदे लक्षात घेता पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्याल्या जाणाऱ्या जंत निर्मूलन सप्ताहामध्ये लहान-मोठ्या जनावरांचे जंत निर्मूलन करून घ्यावे. त्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73619 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top