मंत्र्यांना गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्र्यांना गर्दी
मंत्र्यांना गर्दी

मंत्र्यांना गर्दी

sakal_logo
By

माजी मंत्र्यांना भेटण्यासाठी गर्दी
कार्यकर्त्यांचे मानले आभार; मुश्रीफ, सतेज पाटील दहा दिवसांनी कोल्हापुरात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः राज्यातील सत्ता नाट्यानंतर तब्बल आठ-दहा दिवसांनी कोल्हापुरात आलेले माजी पालकमंत्री सतेज पाटील व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज गर्दी केली होती. श्री. पाटील यांनी अजिंक्यतारा कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या, तर श्री. मुश्रीफ सकाळी बँकेत, तर सायंकाळी विश्रामगृहावर थांबून होते.
अडीच वर्षांपूर्वी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर जिल्ह्यातून सतेज पाटील, हसन मुश्रीफ व अपक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर मंत्री झाले. यातील श्री. मुश्रीफ वगळता दोघांना राज्यमंत्री पद मिळाले. श्री. पाटील हे पालकमंत्री झाले. गेल्या अडीच वर्षांत श्री. पाटील यांच्यासह मुश्रीफ यांनी एकत्रित जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षांत कोरोनाच्या लाटेतही इतर आमदारांना सोबत घेऊन या दोघांनी चांगली कामगिरी केली.
गेल्या महिन्यात शिवसेनेत फूट पडली आणि आघाडी सरकार राहते का जाते, या शंकेने कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. शेवटी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार गडगडले. परिणामी जिल्ह्यातील तिन्हीही मंत्र्यांची मंत्रिपदे गेली. या घडामोडीच्या काळात श्री. मुश्रीफ व श्री. पाटील हे मुंबईतच तळ ठोकून होते. तब्बल आठ-दहा दिवसांनंतर कोल्हापुरात आलेल्या या दोन माजी मंत्र्यांना भेटण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. श्री. यड्रावकर हे बंडखोर गटासोबत गुवाहाटीमार्गे गोवा व तेथून मुंबईला तर सायंकाळी या दोघांसह इतर आमदारही उद्यापासून सुरू होणाऱ्या दोनदिवसीय अधिवेशनासाठी मुंबईला रवाना झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73671 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..