आजरा ः आवंडी धनगरवाडा बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः आवंडी धनगरवाडा बातमी
आजरा ः आवंडी धनगरवाडा बातमी

आजरा ः आवंडी धनगरवाडा बातमी

sakal_logo
By

33311

विषबाधा झाल्यानेच आठ गायींचा मृत्यू
पशुवैद्यकांचा दुजोरा; पशुपालकांना मदतीची प्रा. आबिटकर यांची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २ ः आवंडी धनगरवाडा क्रमांक तीन (ता. आजरा) या धनरवाड्यावरील आठ गायींचा मृत्यू बिषबाधा झाल्याने झाला आहे. त्यामुळे पशुपालकांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. जिल्हा बॅंकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी धनगरवाड्याला भेट दिली. तहसीलदार विकास अहिर, पशुपालक व आवंडीचे सरपंच बाबू येडगे यांच्याशी चर्चा केली. घटनेची आमदार प्रकाश आबिटकर यांना माहिती दिली असून, नुकसानग्रस्तांना मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आवंडी (ता. आजरा) येथील धनगरवाडा क्रमांक तीनवर आठ देशी गायींचा मृत्यू झाला आहे. गेले तीन-चार दिवसांत गायी दगावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रा. आबिटकर यांनी भेट दिली. पशुधनविस्तार अधिकारी डॉ. पी. डी. ढेकळे यांच्याकडून माहिती घेतली. त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकरी बयाजी गंगाराम कोकरे, बबन विठू कोकरे, कोंडीबा धुळू कोकरे, जानू बाळू कोकरे, विठू बाबू कोकरे व कोंडीबा गंगाजी कोकरे यांच्याशी चर्चा केली. आमदार आबिटकर यांना याची माहिती दिली असून, नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली. पशुधन विस्तार अधिकारी श्री. ढेकळे यांना सूचना दिल्या. या वेळी विजय थोरवत, संतोष भाटले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आरोग्य पथकाचा तळ
आवंडी धनगरवाड्यावर पशुधन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तळ ठोकला होता. सर्व जनावरांची तपासणी केली आहे. यामध्ये एका गायीची अवस्था बिकट आहे. या गायीचा मृत्यू विषबाधा झाल्याने झाल्याचे डॉ. पी. डी. ढेकळे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73677 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top