विद्यार्थ्यांकडून संशोधन गरजेचे ः डॉ. स्नेहा गोगटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांकडून संशोधन गरजेचे ः डॉ. स्नेहा गोगटे
विद्यार्थ्यांकडून संशोधन गरजेचे ः डॉ. स्नेहा गोगटे

विद्यार्थ्यांकडून संशोधन गरजेचे ः डॉ. स्नेहा गोगटे

sakal_logo
By

33327
गडहिंग्लज : मराठी विज्ञान परिषद व होमी भाभा विज्ञान केंद्रातर्फे झालेल्या कार्यशाळेचे रोपाला पाणी घालून उद्‌घाटन करताना डॉ. स्नेहा गोगटे, डॉ. नरेंद्र देशमुख. शेजारी डॉ. एस. के. नेर्ले, बी. जी. काटे, जे. बी. बारदेस्कर आदी.

विद्यार्थ्यांकडून संशोधन गरजेचे
डॉ. स्नेहा गोगटे; मविप व होमी भाभा विज्ञान केंद्रातर्फे कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : अनेक महत्त्वाचे शोध हे वारंवार केलेले प्रयोग, निरीक्षण व निष्कर्षातून लागलेले आहेत. आपल्या परिसरातील अनेक प्रश्‍नांवर उत्तरे शोधता येतात. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून सातत्याने संशोधन गरजेचे आहे, असे मत डॉ. स्नेहा गोगटे (हैदराबाद) यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषदेची येथील शाखा व होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (मुंबई) यांच्यातर्फे शालेय विज्ञान मंडळ प्रशिक्षण व कार्यशाळा झाली. याप्रसंगी डॉ. गोगटे बोलत होत्या. मविपचे अध्यक्ष जे. बी. बारदेस्कर अध्यक्षस्थानी होते. गडहिंग्लज सायन्स सेंटरमध्ये ही कार्यशाळा झाली.
डॉ. निवेदिता देशमुख यांनी व्यक्तिमत्त्व विकासावर मार्गदर्शन केले. सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी, आत्मविश्‍वास, व्यायाम, नेतृत्वामुळे व्यक्तिमत्त्व विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. नरेंद्र देशमुख यांनी विज्ञानविषयक आवड कशी विकसित करावी, याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. संध्या ठाकूर व डॉ. निनाद प्रधान यांनी शालेय विद्यार्थ्यांना छोटे-छोटे प्रोजेक्ट देऊन विज्ञानाबद्दल आवड व संशोधन वृत्ती निर्माण करता येत असल्याचे सांगितले.
डॉ. एस. के. नेर्ले यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. बी. जी. काटे, भास्कर फडणीस, विश्वनाथ धूप, उदय इंदूलकर, जितेंद्र पाटील, प्रा. बी. डी. पाटील, सुरेश मटकर, डॉ. वरुण धूप, बाळासाहेब बंदी, संजय घाटगे, दिगंबर शिंत्रे, अरुण हावळ, नारायण सावंत उपस्थित होते. मंजिरी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. पंडित वंजारे यांनी आभार मानले. दरम्यान, या कार्यशाळेत गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील २० माध्यमिक विद्यालयाचे ८० विद्यार्थी व २० शिक्षक सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73697 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top