
संक्षिप्त
33266
कोल्हापूर : टी.डी.आर. प्रमाणपत्र प्रदान करताना संजयकुमार चव्हाण, विद्यानंद बेडेकर, आनंद माने, प्रदीप भारमल, अनिल घाटगे, राजीव परीख, मुकेश फुटाणी, चेतन वसा.
टी.डी.आर. प्रमाणपत्राचे वितरण
कोल्हापूर : नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणकडून टी.डी.आर. प्रमाणपत्र वितरण प्रारंभ झाला. सुरज लँड डेव्हलपमेंटसतर्फे उचगाव येथील पाच एकर जमिनीवर सुर्योदय नगर या मंजूर रहीवाशी प्लॉटिंग प्रकल्पामधून प्रादेशिक योजनेतील 30.00 मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी बाधित होणारे क्षेत्र प्राधिकरणाच्या ताब्यात देऊन त्याचे टी.डी.आर. (हस्तांतरण विकास हक्क) प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम प्राधिकरणाच्या कार्यालयात झाला. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपसंचालक, नगर रचना संजयकुमार चव्हाण, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, आर्किटेक्ट व इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे उपस्थित होते. सुरज डेव्हलपमेंटसचे प्रवर्तक आनंद माने, राजीव परीख, चेतन वसा, मुकेश छट्टानी यांनी प्रमाणपत्र स्वीकारले. क्रिडाई कोल्हापूरचे सचिव प्रदीप भारमल, आर्किटेक्ट अनिल घाटगे आदी उपस्थित होते. याकामी प्राधीकरणाचे सहाय्यक नगर रचनाकार संजय चव्हाण, लक्ष्मण कदम, मिलिंद कांबळे यांचे योगदान लाभले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73804 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..