पाणीपुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीपुरवठा बंद
पाणीपुरवठा बंद

पाणीपुरवठा बंद

sakal_logo
By

निम्म्या शहराचा
पाणीपुरवठा
आज बंद
कोल्हापूर, ता. ३ ः शिंगणापूर जल उपसा केंद्राकडील वीजपुरवठा उद्या (ता. ४) बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उपसा बंद राहील. परिणामी, निम्म्या शहराला उद्या पाणीपुरवठा होणार नाही. महापारेषण कंपनी तांत्रिक कामकाजासाठी वीजपुरवठा बंद ठेवणार आहे. त्यामुळे पुईखडी व बावडा जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असणाऱ्या ए, बी व ई वॉर्ड, संलग्न उपनगरे, ग्रामीण भागात पाणीपुरवठा होणार नाही. मंगळवारी (ता. ५) अपुरा व कमी दाबाने होणार होईल. ए, बी वॉर्ड व संलग्न भागांबरोबरच ई वॉर्डमधीलही काही भागांत पाणीपुरवठा होणार नाही. या भागातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. पाण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73834 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top