
पान २ ॲंकर
३३५१७
आजरा ः येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना विभागीय कृषी संहसंचालक बसवराज बिराजदार. यावेळी जयवंतराव शिंपी, उमेश पाटील, भाग्यश्री पवार - फरांदे, डॉ. अनिलकुमार देशपांडे, बाळासाहेब वाघमारे, के.एल.मोमीन आदी
मूल्यसाखळीतून शेतकऱ्यांना विश्वासार्हता मिळावी
बसवराज बिराजदार ः आजऱ्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ३ ः शेतातील उत्पादित मालाला बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. मूल्य साखळी विकसीत होण्याबरोबर मूल्यसाखळीतून शेतकऱ्यांना विश्वासार्हता मिळणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी केले.
येथे शेतकरी मेळावा झाला. यावेळी श्री. बिराजदार यांनी मार्गदर्शन केले. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी अध्यक्षस्थानी होते. आजरा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, रामेथीचे प्राचार्य उमेश पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी क्षाग्यश्री पवार- फरांदे, तालुका कृषी अधिकारी के. एल. मोमीन, पंचायत समिती कृषी अधिकारी सुधीर खोराटे, दिनेश शेट्टे प्रमुख उपस्थित होते. समृध्दीचे कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे यांनी स्वागत केले.
श्री. बिराजदार म्हणाले, महाराष्ट्र शासनाने कृषी संजीवनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीपाबाबत माहीती देण्याबरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा. उत्पादनात वाढ व्हावी. त्याचबरोबर उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्याबाबत शेतकऱ्यांचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे. सौ. पवार- फऱांदे म्हणाल्या, जमिनीची आरोग्य पत्रिकेबाबत शेतकऱ्यांनी सजग असणे गरजेचे आहे. जमिनीचे आरोग्य चांगले असेल तर दर्जेदार उत्पादनाबरोबर उत्पादनात वाढ होते. या वेळी आजरा तालुका शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजीराव सावंत, कृषी अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, कृषी पर्यंवेक्षक सुरेश गुरव आदी उपस्थित होते. संभाजी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संचालक नारायण मुरुकुटे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73836 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..