खेळाडूंनो, चांगला माणूस बना ः परेश शिवलकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेळाडूंनो, चांगला माणूस बना ः परेश शिवलकर
खेळाडूंनो, चांगला माणूस बना ः परेश शिवलकर

खेळाडूंनो, चांगला माणूस बना ः परेश शिवलकर

sakal_logo
By

33484
गडहिंग्लज : गडहिंग्लज युनायटेडचा खेळाडू ओमकार घुगरीचा कुटुंबीयासह गौरव करताना परेश शिवलकर. शेजारी जे. बी. बार्देस्कर, मुरारी चिकोडे, संभाजी शिवारे, महादेव पाटील आदी. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

खेळाडूंनो, चांगला माणूस बना
परेश शिवलकर; गडहिंग्लज युनायटेडतर्फे ७० फुटबॉलपटूंचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : खेळ अनेक गोष्टी शिकवितो. शिस्त, आदर, सांघिक भावना, संघर्ष, सहकार्य हे यातील काहीं बाबी आहेत. त्यामुळे खेळाडूंनो, खेळात करिअर तर कराच, पण खेळाच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिकवणुकीतून चांगला माणूस देखील बना असा सल्ला माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू परेश शिवलकर यांनी दिला. ते येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित खेळाडूंच्या गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. एम. आर. हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ७० फुटबॅालपटूंचा गौरव झाला.
गडहिंग्लज युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात हंगामात खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. शिवलकर म्हणाले, ‘‘खेळामुळेच चांगल्या व्यक्तिमत्त्‍वाची जडणघडण होत असते. आजच्या स्पर्धेच्या काळात अष्टपैलू असणे गरजेचे आहे. पालकांची उपस्थिती लक्षात घेता आता जागरुकता वाढत असल्याचे आशादायक चित्र आहे. सर्वच पालकांनी जाणीवपूर्वक पाल्याला खेळाकडे वळवावे.’’
साधना शिक्षण संस्थेचे सचिव जे.बी. बार्देस्कर म्हणाले, ‘‘प्रशिक्षक, शिक्षकाबरोबरच पालकांची जवाबदारी देखील वाढली आहे. कर्ता पुरुष विविध व्यापामुळे मुलांसाठी अपुरा वेळ देतात. यामुळे विद्यार्थ्यांची आईची भूमिका महत्त्‍वाची बनली आहे. तुम्ही सकारात्मक राहून पाल्यांना सूचना केल्यास ते नक्कीच आचरणात आणतात.’’ या वेळी ओमकार घुगरी, ओमकार सुतार, अभिषेक पोवार यांसह वरिष्ठ, १८, १६ आणि चौदा वर्षाखालील संघातील खेळाडूंची विविध स्पर्धात मिळविलेल्या यशाबद्दल गौरव करण्यात आला. युनायटेडचे खजिनदार महादेव पाटील, संचालक संभाजी शिवारे, उद्योजक मुरारी चिकोडे, प्रशांत दड्डीकर, माजी खेळाडू निसार पटेल, महेश गाडवी, सुनील साठे, मनीष कोले यांच्यासह खेळाडू, पालक उपस्थित होते. ललित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. भूपेंद्र कोळी यांनी आभार मानले.
----------------
चौकट
समाधान नको
खेळाडूंनी कधीही कामगिरीवर समाधान मानता कामा नये. प्रत्येक वेळी त्यांनी पुढील टप्प्याचे लक्ष्य ठेवावे. त्यामुळे सामन्यागणिक त्यांची कामगिरी उंचावत जाईल, असा सक्सेस मंत्र शिवलकर यांनी खेळाडूंना दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73846 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..