
पान ३
33496
इचलकरंजी ः पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीवर आता महापालिका झाल्याचा फलक रविवारी लावला. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्र)
इचलकरंजीत प्रशासकीय
इमारतीवर महापालिकेचा झळकला
इचलकरंजी, ता.३ ः संस्थानकाळापासून कार्यरत असलेल्या इचलकरंजी पालिकेचे अस्तित्व आता संपुष्टात आले आहे. शासन निर्णयानुसार पालिकेचे रूपांतर आता महापालिकेत झाले असून, प्रशासनाकडून त्याची पुढील कार्यवाही सुरू केली आहे. यात आज पालिकेच्या प्रशासकीय इमारतीवर आता महापालिकेचा फलक झळकला. जुन्या प्रशासकीय इमारतीवरही महापालिकेचा फलक लावला आहे. त्यामुळे आता महापालिका असलेले शहर म्हणून इचलकरंजीची ओळख ठळक बनत चालली आहे. इचलकरंजी पालिकेला संस्थान काळापासूनचा इतिहास आहे. पालिकेच्या प्रशासकीय इमारतींचा प्रवास काळानरूप बदलला. नरसोबा कट्टा येथून पालिकेचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर गोविंदराव हायस्कूलसमोरील सीटीसर्व्हे इमारत, मंगलधामधील नारायण सभागृह आणि त्यानंतरही महात्मा गांधी पुतळ्याजवळील भव्य इमारत असा प्रवास रंगला. त्यानंतर सध्या स्टेशन रोडवर क्लस्टर योजनेतून साकारण्यात आलेल्या विस्तीर्ण इमारतीत पालिकेचे प्रशासकीय कामकाज काही वर्षांपासून सुरू आहे. शासनाने इचलकरंजीसाठी महापालिका मंजूर केली. त्यामुळे शतकोत्तर पंरपरा असलेल्या इचलकरंजी पालिकेचे अस्तित्व संपले. आता इचलकरंजीला महापालिका म्हणून नवी ओळख मिळाली. त्याचबरोबरच प्रशासकीय इमारतीवर गेल्या अनेक वर्षापासून पालिका म्हणून झळकत असलेले फलकही आता मागे पडले. आता या ठिकाणी महापालिकेचे फलक प्रशासनाकडून आज लावले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73863 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..