राष्ट्वादी निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्वादी निवेदन
राष्ट्वादी निवेदन

राष्ट्वादी निवेदन

sakal_logo
By

33510
हरकतींसाठीची आठवड्याने
मुदत वाढवा, अन्यथा आंदोलन

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महापालिका प्रशासनला निवेदन

कोल्हापूर, ता. ३ ः महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी करण्याचे काम कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने केले आहे. वेगवेगळ्या परिसरातील मतदारांची नावे गायब झाल्याचे दिसते. सर्वच यादीतील या चुका दुरूस्त कराव्यात. त्यासाठी हरकतींसाठीची मुदत आठवड्याने वाढवावी. चुका दुरूस्त न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज निवेदनाद्वारे महापालिका प्रशासनाला दिला.
शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त रविकांत आडसूळ यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, अनेक प्रभागांतील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागांत गेली आहेत. प्रभाग १९ मध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. जवळपास ११०० मतांची यादी प्रभाग १२ मध्ये जोडली आहेत. कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरात जाऊन चौकशी केल्यानंतर विविध परिसरांतील नावे गायब झाल्याचे दिसून आले. इतर प्रभागातील नावे या प्रभागांमध्ये आली आहेत. सर्व बीएलओंमार्फत पुन्हा घराघरांत जाऊन चौकशी करून वगळलेले मतदार पुन्हा मूळ प्रभागात येतील याची खबरदारी घ्यावी. मयतांची नावे, दुबार नावे आहेत. यामुळे अशा चुका दुरूस्त करण्यासाठी हरकत घेण्याची मुदत एक आठवडा वाढवावी.
शिष्टमंडळात आदिल फरास, अनिल घाटगे, फिरोज सरगूर, विनायक फाळके, रमेश पोवार, प्रकाश गवंडी, सचिन पाटील, सुनील देसाई, अमोल जाधव आदी सहभागी होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73868 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top