
राधानगरी, शाहूवाडी, गगनबावड्यात मूसळधार
राधानगरी, शाहूवाडी,
गगनबावड्यात मुसळधार
रुई बंधारा पाण्याखाली; शहर परिसरात उन्हाचा तडाखाही
कोल्हापूर, ता. ३ : जिल्ह्यात राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्ंयात मुसळधार, तर इतर तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, तर इचलकरंजी येथील रुई बंधारा पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, पाणथळ परिसरात मुसळधार पाऊस असल्याने नदीपात्रातील पाणी वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांचे अनियमित वेळापत्रक सुरू आहे. कधी जोरदार, तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. जिल्ह्यात आज सकाळीपासून रात्रीपर्यंत ऊन-पावसाचा खेळ सुरू होता, तर राधानगरी, शाहूवाडी आणि गगनबावडा तालुक्ंयात काहीकाळ मुसळधार पाऊस झाला आहे. कोल्हापूर शहर परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, तर अधून-मधून उन्हाचा तडाखाही जाणवला. याचाच फायदा घेत आज भात, भुईमूग, सोयाबीन पेरणीला गती आली आहे.
राधानगरी धरण क्षेत्रात
६१ मिलिमीटर पाऊस
राधानगरी ः दोन दिवसांपासून राधानगरीसह काळम्मावाडी, तुळशी धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे; मात्र यंदा जून महिन्यात राधानगरी आणि काळम्मावाडी धरण क्षेत्रात गतवर्षीपेक्षा कमी म्हणजे ४५ टक्के, तर तुळशीत अवघा १७ टक्के पाऊस झाला आहे.
चोवीस तासांत राधानगरी धरण क्षेत्रात ६१, तुळशी ३०, तर काळम्मावाडीत २५ मिलिमीटर पाऊस झाला. १ जूनपासून आजअखेर धरण क्षेत्रात झालेला
--
पाऊस, कंसात गतवर्षीचा पाऊस -
राधानगरी-४३९ (९९१), काळम्मावाडी ३४० (८०२), तुळशी १७६ (९८१) तुळशी आणि काळम्मावाडी धरण वगळता आजमितीस राधानगरीतील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा अधिक आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73925 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..