निधन वार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वार्ता
निधन वार्ता

निधन वार्ता

sakal_logo
By

33787
शोभा पाटील
कोल्हापूर ः येथील सांस्कृतिक क्षेत्रात सतत प्रयोगशील काम करणाऱ्या शोभा पाटील (वय ६०) यांचे निधन झाले. नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांच्या त्या आई तर तपस्यासिध्दी कला ॲकॅडमीच्या सचिव होत. फक्त दहावी उत्तीर्ण असूनही त्यांनी विविध व्यवसाय यशस्वी केले. संयोगिता पाटील यांनी केलेल्या भरतनाट्यममधील दोन विश्वविक्रमी उपक्रमात त्यांनी सर्व व्यवस्थापन सांभाळले होते. फायर फायटींगचे काम करणाऱ्या महिला म्हणूनही त्यांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख होती.
.......
33789
धोंडिराम ढिसाळ
कोल्हापूर ः जिल्हा माहिती कार्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी धोंडिराम शंकर ढिसाळ (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.६) आहे.
--
३३५२८
सावित्री परीट
कोल्हापूरः मोरेवाडी (ता. करवीर) येथील प्रतिष्ठित नागरिक सावित्री पांडुरंग परीट (वय ७२) यांचे निधन झाले. माजी सरपंच शिला परीट यांच्या त्या सासू होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुना, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे.
-
33757
पद्माकर चोडणकर
कोल्हापूर : गुलाब गल्ली, मंगळवार पेठ येथील पद्माकर (नाना) विष्णुपंत चोडणकर (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ६) आहे.
-
02853
सुशिला सन्ने
उत्तूर ः येथील सुशिला विराप्पा सन्ने (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे . व्यापारी गंगाधर सन्ने यांच्या त्या आई होत.
-
33790
सोनाबाई दिवसे
कोल्हापूर ः नागदेववाडी (ता. करवीर) येथील सोनाबाई बाबुराव दिवसे (वय ७०) यांचे निधन झाले. त्या नागनाथ भजनी मंडळाचे बाबुराव दिवसे यांच्या पत्नी तर माजी सरपंच दिपाली दिवसे यांच्या सासुबाई होत. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.६) आहे.
-
02477
अनुसया जाधव
कुडित्रे ः दोनवडे (ता. करवीर) येथील अनुसया बळवंत जाधव (वय ८०) यांचे निधन झाले. मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ५) आहे.
-
01169
बंडा चौगुले
पोर्ले तर्फे ठाणे ः येथील बंडा श्रीपती चौगुले (कंत्राटदार) (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार भाऊ, भावजय, पुतणे व नातू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता ५) आहे.
-
01674
सुरेश काळे
पेठवडगाव :येथील माजी सैनिक सुरेश शामराव काळे यांचे निधन झाले. वडगाव चर्चचे ते ज्येष्ठ संचालक होत. त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावयी असा परिवार आहे. फुले वाहण्याचा कार्यकम मंगळवारी (ता. ५) आहे.
-

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73940 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..