कर्नाटक हद्दीत गतीरोधके फार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नाटक हद्दीत गतीरोधके फार!
कर्नाटक हद्दीत गतीरोधके फार!

कर्नाटक हद्दीत गतीरोधके फार!

sakal_logo
By

33538
कोवाड : उचगाव गावाशेजारी रस्त्यावर तयार केलेले मोठे गतिरोधक. यावर पांढरे पट्टे नसल्याने वाहन धारकांची कसरत होते.

कर्नाटक हद्दीत गतिरोधके फार!
कोवाड-बेळगाव मार्ग; उचगावशेजारी दीड किलोमीटरमध्ये पाच गतिरोधक
अशोक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. ६ : कोवाड ते बेळगाव मार्गावरील कर्नाटक हद्दीतील उचगाव गावाशेजारी रस्त्यावर एक ते दीड किलोमीटर अंतरावर पाच गतिरोधक निर्माण केले आहेत. वाहनांची गती कमी होऊन अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी तयार केलेल्या या गतिरोधकांचा वाहनधारकाना त्रास होत आहे. मोठ्या उंचीचे गतिरोधक वाहनांसह प्रवाशांना धोकादायक बनत असल्याने कर्नाटक शासनाने गतिरोधक कमी करावेत, अशी मागणी सीमाभागातील प्रवाशांतून होत आहे.
एखाद्या रस्त्यावर अपघात वाढले, की नागरिकांची मागणी म्हणून तेथे गतिरोधक बसविण्याचा उपाय केला जातो. या तात्पुरत्या उपायामुळे नागरिकांचा रोष कमी होत असला, तरी अशास्त्रीय पद्धतीच्या गतिरोधकाचे दीर्घकालीन तोटे लक्षात घेतले जात नाहीत. असाच काहीसा प्रकार कोवाड ते बेळगाव रोडवरील उचगाव हद्दीतील रस्त्यावर झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. उचगावपासून एक किमी अंतरावर जवळपास पाच गतिरोधक तयार केले आहेत. दररोज रस्त्यावर वाहनांची मोठी रहदारी असते. मोठमोठे उंचवटे तयार करून केलेले गतिरोधक अभ्यासपूर्वक बसविलेत का, असा प्रश्न प्रवाशांतून विचारला जात आहे. अपघात रोखण्यासाठी टाकण्यात आलेले हेच गतिरोधक अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. भरधाव जाणाऱ्या वाहनाना या गतिरोधकांची कल्पना येत नसल्याने रात्रीच्यावेळी अपघात होत आहेत. गतिरोधकांची उंची मोठी असल्याने प्रवाशांना मान, पाठ, मणक्याचा त्रास सुरू झाला आहे. वाहनांचेही नुकसान होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरणारे गतिरोधक कमी करावेत, अशी मागणी होत आहे.
--------------
चौकट
सूचना फलक नाहीत...
गतिरोधक उभारल्यावर त्यावर थर्मी प्लास्टिक पेन्ट पट्ट्या, पांढरे पट्टे काढणे आवश्यक आहे. शिवाय वाहनचालकांना सूचना मिळण्यासाठी गतिरोधक येण्याआधी ४० मीटर अंतरावर सूचना फलकही रस्त्यावर असणे अपेक्षित आहे. पण असे कुठेही येथे दिसत नसल्याने वाहनचालकांत संताप आहे.
----------
गतिरोधकावर गाडी आदळल्याने शरीराला मानेच्या मणक्यासह, पाठीला नाजूक भागास त्रास होतो. अचानकपणे दणका बसल्याने मज्जारज्जू दुखावला जातो. मणक्याची गादी सरकणे, सायटिका, वयस्क माणसांची हाडे ठिसूळ असल्याने ती मोडणे असे प्रकार आढळून येतात.
- डॉ. चंद्रकांत पाटील, कोवाड

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73971 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..