इचल : साहित्यकृती पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : साहित्यकृती पुरस्कार जाहीर
इचल : साहित्यकृती पुरस्कार जाहीर

इचल : साहित्यकृती पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

आपटे वाचन मंदिराचे पुरस्कार जाहीर
उत्कृष्ट साहित्यकृती; संजय चौधरी, जया दडकर, गणेश मतकरी आदींचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ४ ः येथील आपटे वाचन मंदिराच्या वतीने देण्यात येणारा इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार नाशिक येथील कवी संजय चौधरी (नाशिक) यांच्या ‘...आतल्या विस्तवाच्या कविता’ काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनी ग्रंथालयास दिलेल्या देणगीत भर घालून दरवर्षी पुरस्कार दिला जातो. सन्मानपत्र व पाच, तीन, दोन हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट मराठी साहित्यकृती पुरस्कार ‘जया दडकर (मुंबई) यांच्या ‘चिं. त्र्यं. खानोलकर ः आदिपर्व’ या साहित्यकृतीस जाहीर झाला. इचलकरंजीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून शिल्लक निधीतून ट्रस्टची स्थापना केली आहे. त्यातून दरवर्षी उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृतीस पुरस्कार देण्यात येतो. आशाताई सौंदत्तीकर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार गणेश मतकरी (मुबंई) यांच्या ‘बटरफ्लाय इफेक्ट’ साहित्यकृतीस, वि.मा. शेळके (गुरुजी) उत्कृष्ट कांदबरी पुरस्कार शुभांगी भडभडे (नागपूर) यांच्या ‘दीपशिखा कालिदास’ साहित्यकृतीस, पार्वती शंकरराव तेलसिंगे उत्कृष्ट बाल साहित्यकृती पुरस्कारासाठी एकनाथ आव्हाड (मुंबई) यांच्या ‘छंद देई आनंद’ या साहित्यकृतीची निवड झाली आहे.
उत्कृष्ट अनुवादासाठीचा महादेव बाळकृष्ण जाधव उत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती पुरस्कार पृथ्वीराज तौर (नांदेड) व स्वाती दामोदरे (अकोला) यांच्या ‘स्त्रीकोश भारतीय स्त्री कविता’ साहित्यकृतीस, वसंतराव दातार यांच्या स्मरणार्थ लक्षणीय काव्यसंग्रह म्हणून ‘कथार्सिस’ (सारिका उबाळे, अमरावती) व ‘उमलावे आतुनीच’ (प्रतिभा सराफ, मुंबई) या साहित्यकृतीची विभागून निवड केली. सुलभा मगदूम यांच्या स्मरणार्थ लक्षणीय काव्यसंग्रह म्हणून ‘धगधगते तळघर’ (उषा हिंगोणेकर, जळगाव) व ‘काजव्यांचे झाड’ (अनुपमा उजगर, ठाणे) या साहित्यकृतींची विभागून निवड केली. लक्षणीय गद्य साहित्यकृतीसाठी गांधींचे गारुड (संजीवनी खेर, मुंबई) व ऑन द फिल्ड, प्रगती बाणखेले (मुंबई) साहित्यकृतीची निवड केली. उत्कृष्ट ललित गद्य साहित्यकृती पुरस्कारासाठी डॉ. रवींद्र तांबोळी, पुणे (पत्नीपुराण) यांची निवड केली आहे.

पुरस्कार वितरण सोमवारी
पुरस्कार वितरण इंदिरा संत यांच्या स्मृतिदिनी १३ जुलैला सांयकाळी ५ वाजता ग्रंथालयाच्या बजाज सभागृहात होणार आहे. या वेळी स्थानिक साहित्यिक गौरव पुरस्कार शामराव कुलकर्णी यांना तर उत्कृष्ट वाचक पुरस्कार पांडुरंग डोंगरे यांचाही गौरव केला जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73986 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..