सामानगडचा पर्यटन विकास दृष्टीपथात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामानगडचा पर्यटन विकास दृष्टीपथात
सामानगडचा पर्यटन विकास दृष्टीपथात

सामानगडचा पर्यटन विकास दृष्टीपथात

sakal_logo
By

33603

सामानगडचा पर्यटन विकास दृष्टिपथात
जिल्हाधिकारी रेखावार यांनी केली पाहणी; दोन कोटींच्या निधीतून होणार निसर्ग पर्यटनाची कामे
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : तालुक्यातील ऐतिहासिक पर्यटनस्थळ असलेल्या किल्ले सामानगडचा विकास दृष्टिपथात आहे. खुद्द जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दोन कोटी मंजूर निधीतून कोणकोणती विकासकामे करता येतील, यासाठी सामानगडला भेट देऊन दोन तास किल्ला पिंजून काढला. जिल्ह्याच्या पर्यटनस्थळ विकासाचा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांनी अजेंड्यावर घेतला असून, त्यासाठी ते स्वत: पर्यटनवाढीसाठी काय करावे लागेल, याच्या माहितीसाठी कार्यवाही करत आहेत.
प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून किल्ले सामानगड विकासासाठी दोन कोटी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. निधीतील ५० लाखांतून मारुती मंदिराच्या बहुउद्देशीय सभागृहाजवळ स्वच्छतागृहही बांधण्यात येणार आहे. उर्वरित एक कोटी ५० लाखांतून निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने विविध विकासकामे होणार आहेत. यात कोणकोणती कामे करणे आवश्यक आहे, याची माहिती घेण्यासाठी त्यांनी स्वत: रविवारी सुटीदिवशी सामानगडला भेट दिली. चिंचेवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी, दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्तेही त्यांच्या सोबत होते. या वेळी ग्रामस्थांनी सामानगडच्या ढासळलेल्या बुरुजाची दुरुस्ती व पुनर्बांधणीची मागणी केली. पर्यटकांसाठी किल्ल्यावर निवासस्थानाची सूचनाही केली. चिंचेवाडी ग्रामपंचायतीतर्फे जिल्हाधिकारी रेखावार यांच्या हस्ते गडावर वृक्षारोपणही केले. रिमझिम पावसातच जिल्हाधिकाऱ्यांनी दोन तास किल्ला पिंजून काढला. कोणत्या ठिकाणी निसर्ग पर्यटनाची कामे करता येतात, याची माहिती घेतली. रेखावार यांनी संपूर्ण किल्ल्याचा सर्व्हे करण्यात येणार असून त्यानंतर प्राधान्याने कोणती कामे हाती घ्यायची, हे ठरविले जाणार असल्याचे सांगितले.
सरपंच राजश्री घेवडे, उपसरपंच संदीप नाईक, सुभाष घेवडे, राजू गुरव, कलाप्पा नाईक, कैलास परीट, के. टी. शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. रेखावार यांच्यासोबत प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, नायब तहसीलदार व्ही. एम. बुट्टे, मंडल अधिकारी संभाजी माळी होते.


दृष्टिक्षेपात
प्रादेशिक पर्यटन विकासमधून निधी
किल्ले सामानगड विकासासाठी दोन कोटी
मारुती मंदिराच्या सभागृहाजवळ स्वच्छतागृह
निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने विविध विकासकामे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74017 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..