खेल के सिकंदर भाग सात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेल के सिकंदर भाग सात
खेल के सिकंदर भाग सात

खेल के सिकंदर भाग सात

sakal_logo
By

बंदोबस्त संग्रहीत फोटो
--
लोगो- खेल के सिकंदर -भाग- ७

पोलिस खेळाडू बंदोबस्तात फीट

शारीरिक क्षमतेसह जनसंपर्काचा उपयोग; गुन्हे शोध पथकातही महत्त्वपूर्ण भूमिका

राजेश मोरे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः मैदानावरील सरावातून कमवलेली शारीरिक तंदुरुस्ती, जनसंपर्क आणि निर्णय क्षमता हे गुण खेळाडूंच्या अंगी असतात. त्याआधारेच सण, उत्सव, सभा यासारख्या मोठ्या बंदोबस्ताची जबाबदारी वर्दीतील खेळाडू सक्षमपणे पूर्ण करतात. गुन्हे शोध पथकात (डी.बी) कर्तव्य बजावताना गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

पोलिस दलातील अधिकारी कर्मचारी २४ तास कर्तव्याला बांधिल असतात. दिवस-रात्रीची ड्यूटी, दैनंदीन काम, बंदोबस्त, गुन्ह्यांची उकल, त्यासाठी करावा लागणारा लांबचा प्रवास हे पोलिसांच्या अंगवळणीच पडलेले असते. कामाचा ताण त्यांच्या आरोग्यावर न कळत परिणाम करत असतो; पण हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, तायक्वाँदो, ॲथलेटिक्स, रग्बी अशा मैदानी खेळाशी जोडले गेलेले खेळाडू पोलिस शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात. समोरच्या स्पर्धकांवर मात करण्यासाठी क्षणात निर्णय घ्यावा लागत असल्याने त्यांची निर्णय क्षमता चांगली असते. या सर्व गुणांचा उपयोग गणेशोत्सवासारख्या मोठ्या आणि दीर्घ काळाच्या बंदोबस्तात पोलिस यंत्रणेला उपयोग होतो. तत्कालीन पोलिस अधीक्षक सुखविंदर सिंह यांनी पहिल्यांदा पोलिस खेळांडूना गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात सहभागी करून घेतले. त्यानंतर ही परंपरा अखंडित पुढे सुरू आहे.
पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध (डी.बी.) पथक असो वा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यातही पोलिस खेळाडूंची संख्या अधिक असते. मैदानातून त्यांच्या अंगी आलेल्या गुणांचा तपास कामात उपयोग होतो. पोलिस यंत्रणेने जिल्ह्यात काही वर्षांत अनेक घरफोड्या, लूटमारी, खून यासारख्या गंभीर गुन्ह्यांची उकल केली. त्यासाठी लागणारी गुप्त माहिती, सापळा, गुन्हेगारांना जेरबंद करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. (समाप्त)

विशेष मोहिमेतही सहभाग...
अवैध धंद्यांचा बीमोड करण्याबरोबर कोंबिंग ऑपरेशनसारख्या विशेष मोहिमेसह व्हीआयपी बंदोबस्तात वर्दीतील खेळाडूंचा सहभाग हा इतरांच्या तुलनेत अधिक असल्याचे चित्र पाहावयास मिळते.

----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74036 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top