पैलवान अंजली देशिंगेचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैलवान अंजली देशिंगेचा सत्कार
पैलवान अंजली देशिंगेचा सत्कार

पैलवान अंजली देशिंगेचा सत्कार

sakal_logo
By

33624
-------
पैलवान अंजली देशिंगेचा सत्कार
इचलकरंजी, ता. ४ ः हरियाना (पंचकुला, चंदिगड) येथे झालेल्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारतात टॉप टेन रँकिंगमध्ये शहापूरची पहिली महिला कुस्तीगीर अंजली पोपट देशिंगेने यश मिळवले. यानिमित्त तिचा शहापूर ग्रामस्थांतर्फे माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांच्या हस्ते सत्कार केला. दादा भाटले, पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनचे संचालक पांडुरंग सोलगे, उद्योगपती जालंदर पाटील, अशोक चव्हाण, अशोक पुजारी आदी उपस्थित होते. अंजलीने सेकंड राउंडमधील कुस्तीमुळे कुस्तीशौकिनांची मने जिंकली. अंशू मलिक (हरियाना) विरुद्ध अंजली देशिंगे (महाराष्ट्र) यांच्यात कुस्ती झाली. अंजलीने शेवटच्या पाच सेकंदांमध्ये फ्रंट सालतो या डावावर कुस्ती मारली. यामुळे राष्ट्रीय रँकिंग कुस्ती स्पर्धेमध्ये टॉपटेनमध्ये तिला स्थान मिळाले. शहापूरसाठी ही बाब खूप अभिमानास्पद असल्याचे तिच्या सत्कारप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74046 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..