
नूल परिसरातील संक्षिप्त बातम्या
33659
मुगळी : गुणवंत विद्यार्थी सत्कारप्रसंगी बी. जी. स्वामी, सुरेश पाटील, आप्पासाहेब जाधव, के. डी. धनवडे, श्रीपाद स्वामी आदी.
मुगळीत गुणवंतांचा सत्कार
नूल : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील महात्मा गांधी वाचनालय व अभ्यासिका केंद्रातर्फे दहावी परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आदित्य धनवडे, वृषाली पाटील, निशा शिवारे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रंथपाल के. डी. धनवडे यांनी स्वागत केले. सचिव आपासो जाधव यांनी प्रास्तविक केले. संरपच व सस्थेचे कार्यवाह बी. जी. स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुगळी हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल मुख्याध्यापिका विद्यादेवी लोहार, एम. आर. शिंदे, एस. के. सागर, पी. आय. कदगल, एस. बी. कांबळे, एस. एस. खडकेकर, एम. डी. रणवरे, पी. पी. महाजन या शिक्षकांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. सुरेश पाटील, शंकर माने, ईश्वर हुल्लोळी, गजानन कांबळे, आपासो जाधव, आपासो कदम, सागर आरबोळे, सुरेश मुसळे, विजय महाडिक, यांच्यासह वाचक उपस्थित होते. श्रीपाद स्वामी यांनी आभार केले.
--------------
33660
कुंबळहाळ : कृषी सप्ताहनिमित्त वृक्षारोपणप्रसंगी सरपंच सचिन कांबळे, कृषी सहायक अमित शिंदे व शेतकरी.
कुबंळहाळ येथे कृषी सप्ताह उत्साहात
नूल : कुबंळहाळ (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामीण जागरुकता व कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या कृषकन्यांनी कृषी सप्ताह आयोजित केला होता. या वेळी विविध उपक्रम झाले. कृषी सहायक अमित शिंदे यांनी सोयाबीन रोग व किड नियंत्रण, कुक्कुटपालन योजना, पीक व अवजारे कर्ज, गांडूळ खताचे फायदे, खरीप व रब्बी हंगामात घ्यावयाची पिके याविषयी मार्गदर्शन केले. वृक्षारोपणही करण्यात आले. प्रा. यु. एस. मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या निकिता गावडे, शशिकला खतकर, धनश्री पाटील, आकांक्षा सायमोते, प्राची पोवाळकर, मनस्वी कुंभार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सरपंच सचिन कांबळे, उपसरपंच गणपती पाटील, पोलिसपाटील कलाप्पा कांबळे, यशवंत पाटील, बाळासो येणेचवडी, मुख्याध्यापिका जन्नत कमते, काडाप्पा पाटील, शंकर कांबळे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व शेतकरी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74073 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..