फॉर्टीवनर क्लबचा पदग्रहण समारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फॉर्टीवनर क्लबचा पदग्रहण समारंभ
फॉर्टीवनर क्लबचा पदग्रहण समारंभ

फॉर्टीवनर क्लबचा पदग्रहण समारंभ

sakal_logo
By

33737
कोल्हापूर ः फॉर्टीवनर क्लब ऑफचा पदग्रहण समारंभप्रसंगी पदाधिकारी.

फॉर्टीवनर क्लब ऑफचा पदग्रहण समारंभ
रवी डोली अध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी मदन देशपांडे
कोल्हापूर, ता. ४ : येथील फॉर्टीवनर क्लब ऑफ कोल्हापूर चा पदग्रहण समारंभ नुकताच झाला. राष्ट्रीय अध्यक्ष पंकज सिंग व विभागीय अध्यक्ष शिवकुमार बीएच्. यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारला. रवी डोली यांची अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी मदन देशपांडे यांची तर सचिवपदी महेंद्र पाटील व आयपीसी म्हणून उत्तम फराकटे यांची निवड झाली.
मावळते अध्यक्ष उत्तम फराकटे यांनी दोन वर्षातील कार्याचा आढावा घेताना फॅार्टीवनर क्लब ऑफ कोल्हापूरने कोविड, पूरग्रस्त सेवा, दिव्यांगांना मदत, शैक्षणिक मदत, कोमनपा, सीपीआरसह अन्य संस्थांसोबत अनेक समाजउपयोगी उपक्रमांचा पीपीटीच्या माध्यमातून आढावा घेत सर्व सभासदांचे सहकार्याबद्दल आभार मानले. नूतन अध्यक्ष रवी डोली यांनी फॅार्टीवनर क्लब ऑफ कोल्हापूरचे कार्य समर्थपणे पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली. राष्ट्रीय अध्यक्ष पंकज सिंग यांनी क्लबच्या माध्यमातून लोकराजा शाहू महाराजांचा वारसा नेटाने पुढे चालू असल्याचे सांगितले. एव्हरेस्टवीर कस्तुरी सावेकरचा यावेळी सत्‍कार झाला. या वेळी बेस्ट टेबलर धवल चौगुले, कौशल संघवी व बेस्ट फॉर्टीवनर म्हणून महेश खांडके यांना गौरविण्यात आले.
ऋग्वेदा देसाई आणि दिया फराकटे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव महेंद्र पाटील यांनी आभार मानले. या वेळी रवी पाटील, प्रसाद गुळवणी, मनीष संबरगी, विक्रम देसाई, बिपीन मिरजकर, शिवयोगी डंगण्णावर, दीपक सावेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74160 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top