पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

शेतातील बेट तोडल्याचा
जाब विचारल्याने एकास मारहाण
शिरोळ : विनापरवाना शेतातील झाडे तोडल्याचा जाब विचारल्यानंतर शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी एका माजी उपसरपंचावर शिरोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश यशवंत गायकवाड (जांभळी) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याबाबतची तक्रार रमजान मुजावर यांनी दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेतातील बेटाची झाडे तोडताना तक्रारदार यांनी विचारणा केली. संशयित गायकवाड याने तू कोण विचारणार असे म्हणून तक्रारदार यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तक्रारदार यांचा पुतण्या सोडवण्यासाठी आला असता त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर गायकवाड याने विनापरवाना तोडलेली झाडे बैलगाडीतून भरून नेली. याप्रकरणी गायकवाड याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.


१३१५
पाटणे फाट्याजवळ ट्रक उलटला
चंदगड : बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर पाटणे फाट्यानजीक वाळू वाहतूक करणारा ट्रक उलटला. आज पहाटे हा अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बेळगावमधील फाँड्रीसाठी ट्रकमधून ( एमएच ०९ ईएम २६६४) वाळू नेली जात होती. पाटणेफाट्याजवळील वळणावर समोरून येणाऱ्या वाहनांचा लाईट ट्रकचालकाच्या डोळ्यावर पडल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक कलंडला. दरम्यान, या मार्गाच्या साईटपट्ट्या कमकुवत झाल्या आहेत. त्याचे मजबुतीकरण करणे गरजेचे आहे.

इचलकरंजीत समन्वय समितीची बैठक
इचलकरंजी : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार भटके-विमुक्त जातीसंदर्भात विविध सामाजिक प्रश्नांची हाताळणी व सामंजस्याने सोडवणुकीसाठी गावभाग पोलिस ठाणेअंतर्गत समन्वय समिती नियुक्त केली आहे. समितीची पहिली आढावा बैठक आज गावभाग पोलिस ठाण्यात झाली. भटके-विमुक्त समाजातील विविध सामाजिक संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या मदतीने प्रतिष्ठित नागरिकांकडून प्रयत्न करावेत. यासाठी प्रबोधनात्मक चर्चा करावी, अशा सूचना सहाय्यक पोलिस निरीक्षक आबा गाडवे यांनी दिल्या. अन्याय, अत्याचार, त्यांच्या नावे होणाऱ्या खोट्या तक्रारी त्यामुळे समाजात निर्माण होणारे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा झाली. बैठकीस रवी जावळे, राहुल धुमाळ यांसह शासकीय सदस्य म्हणून कैलास वाघमारे, राम पाटील, उदय करडे आदी उपस्थित होते.

मुलाच्या भेटीस आलेल्या वडिलांचा मृत्यू
कोल्हापूर ः जिह्यात शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या भेटीसाठी आलेल्या उस्मानाबाद येथील वडिलांचा सीपीआरमध्ये उपचारापूर्वीच मृत्यू झाला. राजेश अशोक नागदे (वय ४१) असे त्यांचे नाव आहे. नागदे यांचा मुलगा अतिग्रे परिसरातील एका शिक्षण संस्थेत शिक्षण घेतो. काल (ता. ४) ते पालक मीटिंगसाठी परिवारासोबत कोल्हापुरात आले होते. कोल्हापूर सांगली रस्त्यावरील एका हॉटेलवर ते थांबले होते. पहाटेच्या त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना खासगी रुग्णालयातून सीपीआरमध्ये हलविले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.


02442

टोपमधून गवा सादळे-मादळेकडे
टोप : टोप संभापूर परिसरातील चिन्मय गणाधीश (गंधर्व) परिसरात काल दिवसभर ठिय्या मारलेल्या गव्याने रात्री नागरी वस्तीत प्रवेश केला. मध्यरात्री बारापर्यंत गव्याने गल्ली, वाडी वस्तीतून फेरफटका मारला. दक्षिणवाडी, खाणीच्यामागून कासारवाडीमार्गे सादळे-मादळेच्या डोंगराकडे गवा मार्गस्थ झाल्याचे नागरिकांनी सांगितले. येथील चिन्मय गणाधीशच्या मागील बाजूस गर्द झाडीत गवा दिवसभर ठाण मांडून होता. रेस्क्यू टीमने गव्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. रात्री नऊच्या सुमारास गवा टोपच्या दिशेने मार्गस्थ झाला. कल्लेश्वर मंदिर, लुगडे मळा, दक्षिणवाडी व नंतर खाणीच्या मागून कासारवाडीमार्गे सादळे-मादळे डोंगराच्या दिशेने गेल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.


वीजपंप चोरीप्रकरणी एकास अटक
आजरा ः धामणे (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीचा वीज पंप चोरीचा छडा लावण्यात आजरा पोलिसांना यश आले आहे. विजय अशोक गोसावी (वय १९, लिंगनूर, ता. कागल) असे चोरट्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीला वीजपंप व वाहन जप्त केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक बी. एच. कोचरगी, हवालदार आंबुलकर, जाधव, अमोल पाटील यांनी तपास करत चोरी उघडकीस आणली आहे.

जयसिंगपुरातून रिक्षा चोरीस
जयसिंगपूर : शहरातील किसान ट्रेडर्स दुकानासमोरून अनिल शिवाजी ठोमके (चिंचवाड, ता. शिरोळ) यांची तीस हजार रुपयांचा तीन चाकी टेंपो चोरीला गेल्याची घटना रविवारी (ता. ३) उघडकीस आली. याबाबतची फिर्याद ठोमके यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे. तपास जयसिंगपूर पोलिस करीत आहेत.

दुचाकी चोरीप्रकरणी दोघांना अटक
जयसिंगपूर : शहरातील शुभांगी देशमुख यांची ३० हजारांची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली होती. चोरीप्रकरणी शेखर चंद्रकांत आंबी (वय २९), संतोष रामाण्णा गदडे (वय २५, दोघे जयसिंगपूर) यांना मोटारसायकलसह अटक केली होती. सोमवारी येथील प्रथमवर्ग न्यायालयासमोर आंबी व गदडे यांना उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. सरकारी वकील म्हणून सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74175 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top