
पब्लिक ॲडेस सिस्टीम -कोल्हापूर पॅटर्न राज्यात
पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा कोल्हापूर पॅटर्न राज्यात
पूरस्थितीत होतो उपयोग; रत्नागिरी, रायगड, पुणे, साताऱ्यातही होणार कार्यान्वित
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः महापूर किंवा अन्य कोणतीही आपत्ती असो घटनास्थळी न जाताही तेथील नागरिकांना माहिती देण्याचे काम करणारी आधुनिक दवंडी अर्थात पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा कोल्हापुरी पॅटर्न राज्यात पोचत आहे. गतवर्षी कोल्हापुरातून सुरू झालेली ही सेवा आता रत्नागिरी जिल्ह्यात पूर्ण होत आली असून रायगड जिल्ह्यात सुरू होणार आहे. त्यानंतर सातारा सोबत पुण्यात ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
केवळ वॉर रूममध्ये थांबून पूरग्रस्त गावांतील नागरिकांना अलर्ट करण्यासाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम बसविण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतला. जिल्ह्यात ६१५ ठिकाणी ही सिस्टीम बसविली आहे. गतवर्षी याचा चांगला उपयोग झाला आहे. महापूर किंवा अतिवृष्टी येणार असल्याची माहिती सिस्टीमद्वारे दिली जाते. नागरिकांना एका मिनिटांत सर्व माहिती मिळण्यासाठी त्याचा फायदा होत आहे. केवळ वॉररूममधूनच काही ठराविक सूचनाही ठराविक गावांसाठी दिल्या जाऊ शकतात. याचा फायदा विचारात घेऊन कोहापुरातील ही सिस्टीम आता रत्नागिरी जिल्ह्यात बसविण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे महापुराच्या काळात जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्या वॉररूममधून सूचना देणे शक्य होणार आहे.
दृष्टिक्षेपात
एक सिस्टीमसाठी सुमारे २८ हजार खर्च
जिल्ह्यात ६१५ ठिकाणी सिस्टीम कार्यरत
३३१ गावे, १४ नगरपालिका, एका महापालिकेत सिस्टीम
१२९ पूरबाधित गावांना याचा फायदा
७६ मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सिस्टीम
१४ नगरपालिकांच्या सर्व वॉर्डमध्येही कार्यान्वित
बंद सिस्टीम क्षणात वॉररूमला देते सिग्नल
कोट
जिल्ह्यातील पूरस्थितीत पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा वापर प्रभावी ठरला आहे. ही सिस्टीम कोल्हापुरातच तयार केली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या ठिकाणी त्याचा प्रायोगिकस्तरावर उपयोग झाला. कोरोनामध्ये ही सिस्टीम महत्त्वाची ठरली. त्यामुळेच राज्यात ही सिस्टीम वापरली जात आहे. यामुळे कोल्हापुरी पॅटर्न आता राज्यभर पोचत आहे.
प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74241 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..