दौलत देसाई स्वेच्छा निवृत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौलत देसाई स्वेच्छा निवृत्ती
दौलत देसाई स्वेच्छा निवृत्ती

दौलत देसाई स्वेच्छा निवृत्ती

sakal_logo
By

संग्रहातील फोटो वापरावा.

माजी जिल्हाधिकारी
देसाईंची स्वेच्छानिवृत्ती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. कोविड काळात त्यांनी जिल्ह्यात सुरू केलेला ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ उपक्रमाची राज्यपातळीवर दखल घेतली. सध्या ते शासकीय तंत्रशिक्षण विभागाच्या सहसचिव पदावर मुंबईत कार्यरत होते. ‘फेसबुक पोस्ट’द्वारे त्यांनी ही माहिती दिली असून सविस्तर पोस्टद्वारे त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
देसाई यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्या काळातच लोकसभा, विधानसभा निवडणूक शांततेत झाली. महापुराच्या संकटातही त्यांनी धरणातील पाण्याचा विसर्गाचे योग्य नियोजन करून कोल्हापूरकरांना काही प्रमाणात दिलासा दिला होता.
चंदगड तालुक्यातील ४७ गावांतील ५५ हजार शेतकऱ्यांच्या शेतावरील ‘हेरे सरंजाम’ हा शासकीय शिक्का काढून त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर केल्या. शहरातील ‘बी’ टेन्युअरचा मार्गी लावण्याचे कामही त्यांनी केले. कोरोनाच्या काळातही त्यांनी चांगले काम केले. शाहू मिल परिसरातील वसाहतीही त्यांनी शासकीय धोरणांतून मुक्त केल्या. त्यामुळे तेथील नागरिकांनाही आता जागेची स्वमालकी मिळाली आहे. पोस्टद्वारे त्यांनी आजपर्यंतच्या अनुभवांचे सविस्तर वर्णन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74264 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..