भडगावमध्ये आरोग्य केंद्राची पायाभरणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भडगावमध्ये आरोग्य केंद्राची पायाभरणी
भडगावमध्ये आरोग्य केंद्राची पायाभरणी

भडगावमध्ये आरोग्य केंद्राची पायाभरणी

sakal_logo
By

33853
भडगाव : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची पायाभरणी करताना राणी खमलेट्टी, रामाप्पा करिगार, श्रिया कोणकेरी, बसवराज हिरेमठ, विजय खमलेट्टी आदी.

भडगावमध्ये आरोग्य केंद्राची पायाभरणी
गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी खमलेट्टी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. भडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे. त्यासाठी शासनाने पाच कोटी ९२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. जिल्हा परिषद सदस्या राणी खमलेट्टी यांच्या प्रयत्नातून हे काम मार्गी लागले आहे. पायाभरणी कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामाप्पा करिगार, पंचायत समितीचे माजी उपसभापती दयानंद पट्टणकुडी, माजी सदस्या श्रिया कोणकेरी, भीमराव पट्टणकुडी, बाबूराव पाटील, रवींद्र शेंडुरे, लक्ष्मण करगुप्पी, सुरेश देसाई, शंकर कोरी, अनिकेत कोणकेरी, सुरेश घुगरे, भरत येरुले, शिवाजी कोरी, बाळाप्पा कोटगी, ग्रामविकास अधिकारी राजाराम घेवडे उपस्थित होते. विजय खमलेट्टी यांनी स्वागत केले. राजू कुरळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74345 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..