नंदवाळ आषाढी वारी पालखी सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नंदवाळ आषाढी वारी पालखी सोहळा
नंदवाळ आषाढी वारी पालखी सोहळा

नंदवाळ आषाढी वारी पालखी सोहळा

sakal_logo
By

दोन बातम्या आजूबाजूला घ्याव्यात.
...

कोल्हापूरकरांची रविवारी प्रति पंढरपूरवारी
शनिवारी नगरप्रदक्षिणा, पुईखडी येथे सजणार गोल रिंगण सोहळा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : प्रति पंढरपूर नंदवाळ येथील विठ्ठल मंदिरात आषाढी वारीसाठी रविवारी (ता. १०) सकाळी साडेसात वाजता विठ्ठल मंदिर, मिरजकर तिकटी येथून ही दिंडी सुरू होईल. पुईखडी येथे रिंगण सोहळा होईल. शनिवारी (ता. ९) नगर प्रदक्षिणा होईल. या सोहळ्याचा लाभ विठ्ठल भक्तांनी घ्यावा, असे आवाहन ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळाचे दिंडी प्रमुख आनंदराव लाड महाराज, दीपक गौड, संयोजक अध्यक्ष बाळासाहेब पोवार यांनी केले आहे.
शनिवारी नगर प्रदक्षिणा सायंकाळी चार वाजता मिरजकर तिकटी येथून होईल. पहाटे विठ्ठल मंदिरात पूजा, अभिषेक सचिन चव्हाण, जयश्री चव्हाण यांच्या हस्ते होईल. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे दत्तात्रय नाळे, करवीर पोलिसचे सहायक निरीक्षक बनसोडे, वाहतूक पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या हस्ते नगर प्रदक्षिणेचा प्रारंभ होईल. सुजित चव्हाण, विश्वास पाटील आदी उपस्थित राहतील. नगर प्रदक्षिणा मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, भवानी मंडपातील उभ्या रिंगण सोहळ्यासह टिंबर मार्केट येथील सासने इस्टेट येथे विसाव्यास जाईल. येथे शिलावती सासने आणि परिवारातर्फे महाप्रसाद देण्यात येईल.
वारकरी बंधू-भगिनींची आरोग्य तपासणी पंत वालावलकर हॉस्पिटलतर्फे केली जाईल. मुक्कामाच्या ठिकाणी एम. पी. पाटील यांचे प्रवचन आणि दिंडी प्रमुख आनंदराव लाड महाराज यांचे कीर्तन होईल. कांडगाव (ता. करवीर) येथील आठ बैलजोड्या सहभागी होत आहेत. मोरेवाडीतील संतोष रांगोळे यांचे दोन अश्वही रिंगण सोहळ्यात सहभागी होतील. कळंबा येथील वारकरी भगवान तिवले चोपदार म्हणून जबाबदारी पार पाडतील.

खंडोबा तालमीसमोर उभे रिंगण
आषाढी दिनाला रविवारी (ता. १०) सकाळी साडेसात वाजता मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिर येथे मारुती बाऊस्कर, सुहास सोरटे यांच्या हस्ते आरती आणि पालखी पूजन होईल. त्यानंतर नंदवाळकडे दिंडी प्रस्थान करेल. शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळ, खंडोबा देवालयातर्फे माऊलींच्या पालखीवर फुलांची उधळण होईल. खंडोबा तालमीतर्फे अश्वपूजन करून उभे रिंगण पार पडेल. यानंतर पालखी पुईखडीला मार्गस्थ होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74408 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..