
सकाळ कर्मचारी पतसंस्था पदाधिकारी निवड
३३९१८,३३९१९
सकाळ कामगार पतसंस्था
निवडणूक बिनविरोध
अध्यक्षपदी विजय शिंदे, उपाध्यक्षपदी सुरेखा पवार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः सकाळ कामगार सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठी ही निवडणूक झाली. त्यानंतर झालेल्या पदाधिकारी निवड बैठकीत विजय शिंदे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी, तर ‘स्मार्ट सोबती’च्या संपादक सुरेखा पवार यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. आर. कुंभार यांनी काम पाहिले.
संस्थेने नेहमीच सभासदाभिमुख व पारदर्शक कारभाराची परंपरा जपली आहे. तीच परंपरा नेटाने पुढे चालवली जाईल. येत्या काळातही सभासद आणि त्यांच्या पाल्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी संचालक अरविंद वर्धमाने, शरद पाटील, नितीन सुतार, भानुदास धोंगडे, संभाजी गंडमाळे, विजय चौगले आदी उपस्थित होते. संस्थेचे सचिव सतीश चव्हाण यांनी स्वागत केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74429 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..