आवश्यक- संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक- संक्षिप्त
आवश्यक- संक्षिप्त

आवश्यक- संक्षिप्त

sakal_logo
By

33933
काँग्रेसच्या परिवहन
जिल्हाध्यक्षपदी विजयसिंग पाटील
कोल्हापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या परिवहन विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी येथील विजयसिंग पाटील यांची निवड झाली. मुंबईमधील टिळक भवनातील पक्षाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते श्री. पाटील यांना निवडीचे पत्र दिले. श्री. पाटील यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वाहतूक अधीक्षक म्हणून, तसेच कर्मचारी संघटनेचे राज्य चिटणीस म्हणून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर लेक वाचवा अभियान, पूरग्रस्तांसाठी मदत फेऱ्या, आरोग्य शिबिरे तसेच शिवजयंती उत्सव, रक्तदान शिबिरांचे आयोजन, महाडिक वसाहत येथे एसटी महामंडळाच्या बस थांब्याची सोय आदी विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले. त्यांच्या निवडीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रदेश समितीकडे शिफारस केली होती.
..........
शिक्षक समितीचे आंदोलन स्थगित
कोल्हापूर ः प्राथमिक शिक्षण समितीकडील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार यांनी प्राथमिक शिक्षक समितीला दिले. अनेक वर्षे प्राथमिक शिक्षण समितीकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिक्षक समितीने बुधवारी (ता. ६) प्राथमिक शिक्षण समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याची नोटीस दिली होती. या पार्श्वभूमीवर आज बैठक झाली. त्यात विविध मागण्यांबाबत चर्चा झाली. मागण्यांच्या सोडवणुकीसाठी कृती कार्यक्रम ठरवला. मुख्याध्यापक पदोन्नती, ‘डीसीपीएस’ बांधवांचा प्रश्न, वाहतूक भत्ता लागू करणे, वेतन आयोगातील फरक रकमा टप्प्याटप्प्याने देणे, शाळांना अनुदान देणे, ज्या ठिकाणी पट वाढलेला आहे, अशा ठिकाणी शिक्षक देणे आदी मागण्यांबाबत चर्चा झाली. शिक्षक समितीचे राज्यप्रमुख सुधाकर सावंत, शहराध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस संजय कडगावे, उत्तम गुरव, वसंत आडके आदी उपस्थित होते.

....
33920
पुरोगामी संघर्ष परिषदेतर्फे निदर्शने
कोल्हापूर ः पुरोगामी संघर्ष परिषदेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शने झाली. प्रदेशाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब साठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये शिंदेवाडी (ता. पन्हाळा) येथील रस्ता करावा, कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर ई वॉर्डमध्ये अस्वच्छता असून तेथील सफाई ताबडतोब करावी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजना प्रभावीपणे राबवावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष मुसा मुल्ला, शहराध्यक्ष दिलीपराव कांबळे, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सुनीता खटावकर, वरिष्ठ जिल्हाध्यक्षा राधा कांबळे, कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षा पूजा बागडे, पन्हाळा तालुका अध्यक्ष सुनंदा शिंदे, कोल्हापूर संपर्कप्रमुख रुकसाना मुल्ला, वनिता सोनावले, मेहक निशानदार, रंजना जाधव, मंगेश हेगडे, राज्य सल्लागार कमिटीचे सदस्य अंकुश शिंदे आदी उपस्थित होते.


33926
अध्यक्षपदी अनिल जानकर
कोल्हापूर ः राजारामपुरी तेरावी गल्ली येथील संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी अनिल जानकर यांची, तर उपाध्यक्षपदी आनंद कुलकर्णी यांची निवड झाली. २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. मोहन कुरणे, रविकुमार गणपुले, सुनील कुलकर्णी, डॉ. सुधीर भाटवडेकर, सुवर्णा दुर्गे, वृषाली पुजारी यांची संचालकपदी, तर तज्ज्ञ संचालकपदी अभय मिराशी यांची निवड झाली. बाळासाहेब पाटील, अर्जुन तांबेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74448 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top