पूर व्यवस्थापन बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर व्यवस्थापन बैठक
पूर व्यवस्थापन बैठक

पूर व्यवस्थापन बैठक

sakal_logo
By

पूरस्थितीत जबाबदाऱ्या चोख पार पाडा
जिल्हाधिकारी राहुल रेखावार; सर्वतोपरी सहकार्याची मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : जिल्ह्यात सध्या संततधार पाऊस सुरू असल्यामुळे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी दूरध्वनीद्वारे आढावा घेतला आहे. पूरस्थितीत आवश्यक ते सर्व सहकार्य शासन करेल, असे सांगितल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज अधिकाऱ्यांना बैठकीत दिली. पूरस्थिती उद्‌भवल्यास जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहातील बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘पंचगंगेच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पब्लिक अड्रेस सिस्टीम व अन्य माध्यमांद्वारे अद्ययावत माहिती नागरिकांपर्यंत जलदगतीने पोहोचवा. पूरबाधित नागरिक व जनावरांचे वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा. स्थलांतरितांच्या कँपमध्ये सुविधा द्या. जनावरांना हलवण्यासाठी वाहनांची माहिती पशुपालकांना द्या. पाणीपुरवठा बंद झाल्यास टँकरने पुरवठा करा. घाटमाथ्यावर पावसाचे पाणी अडून भूस्खलन, दरडी कोसळण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी वनविभागाने घाटमाथ्यावरील पाण्याचे स्रोत मोकळे करावेत.’’
महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त नितीन देसाई, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

टोल फ्री क्रमांक
रस्त्यावर पुराचे पाणी आल्यास वाहने अडकून दुर्घटना घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त आणि बॅरिकेड्स लावा. अतिरिक्त भाजीपाला व दुग्धसाठा तयार ठेवण्याबाबत दुग्धजन्य संस्थांना कळवा. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. माहितीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या १०७७ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74465 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top