अवनि रोपवाटिकेत श्रमदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवनि रोपवाटिकेत श्रमदान
अवनि रोपवाटिकेत श्रमदान

अवनि रोपवाटिकेत श्रमदान

sakal_logo
By

33955
‘अवनि’च्या मुलांनी
तयार केली रोपे
कोल्हापूर, ता. ५ ः अवनि संस्था संचलित अभ्यासिकेतील मुलांनी आज वाशी (ता. करवीर) येथील ‘अवनि’च्या कस्तुरबा गांधी रोपवाटिकेत श्रमदान केले. मुलांनी तयार केलेली रोपे रोपवाटिकेस प्रदान केली. या मुलांना संस्थेतर्फे गौरविण्यात आले. विचारेमाळ, शिरोली, राजेंद्रनगर, साळोखे पार्क, रेंदाळ, मुडशिंगी येथील अभ्यासिका व बाल अधिकार मंचच्या मुलांनी दोन महिन्यांपासून करंजी, गुलमोहर, चेरी, बदाम, कडीपत्ता, उंबर, पपई, जांभूळ, चिंच, पेरू, कोरफड, गवती चहा, तुळस अशा ५०० रोपांची निर्मिती केली. तसेच औषधी वनस्पती घराशेजारी लावण्याचा उपक्रम घेतला. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू व सिडबँक मुलांनी तयार केली. अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले व उपाध्यक्ष संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी बाल अधिकार मंच केडर जोया तुर्की, सुमित सोनवणे, यश मिसाळ, अनुष्का मागाडे, प्रिन्स चव्हाण, शिक्षिका लता धुमाळ, अलनिसा गणीभाई, सारिका मागाडे, सुरेखा धनवजीर, रेश्मा चव्हाण, वनिता कांबळे, अन्नपूर्णा कोगले, प्रकल्प समन्वयक अविनाश शिंदे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74478 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top