
एपीआयकडून चव्हाणांना मारहाण
33966
गडहिंग्लज : मारहाण झाल्यानंतर आक्रमक झालेल्या अमर चव्हाण यांना पोलिसांनी असे उचलून ठाण्यात नेले. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
लोगो
गोडसाखर कारखाना
34011
गडहिंग्लज : अमर चव्हाण यांना मारहाण केलेले रोहित दिवसे यांच्यावर कारवाईच्या मागणीचे निवेदन राजेश नवले याना देताना आमदार राजेश पाटील व शिष्टमंडळ.
पोलिस अधिकाऱ्याकडून
माजी संचालकास मारहाण
---
गडहिंग्लजला प्रकार; तहसीलदारांसमोरच प्रकार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : गोडसाखर कारखाना जमिनीच्या लिलाव प्रक्रियेविरोधात तहसीलदार दिनेश पारगे यांच्याकडे चर्चेसाठी गेलेले आंदोलक माजी संचालक व पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण आणि बंदोबस्तासाठी नियुक्त सहायक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे यांच्यात जोरदार झटापट झाली. यात दिवसे यांनी चव्हाण यांना मारहाण केली. तहसीलदारांसमोरच त्यांच्या कक्षात घडलेल्या या प्रकाराने दिवसभर तणावाचे वातावरण होते.
दरम्यान, या प्रकरणी अमर चव्हाण यांच्याविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला असून, तशी त्यांना समज नोटीसही दिली आहे. गोडसाखर जागेच्या लिलाव प्रक्रियेची माहिती होण्यासाठी कार्यालयाबाहेर ध्वनिक्षेपकाची व्यवस्था का केली नाही, या मुद्यावर तहसीलदारांशी चर्चा करण्यासाठी जाताना चव्हाणांपाठोपाठ दिवसे व इतर पोलिसही होते. चर्चेवेळी पोलिस कोणालाच प्रवेश देत नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. लिलावधारकांना कार्यालयात प्रवेश दिल्याचे सांगून प्रक्रियेला विरोध करणाऱ्या आंदोलकांना आदेशानुसार प्रवेशद्वारावर रोखल्याचे दिवसे यांनी सांगितले. याच मुद्यावर दोघांमध्ये एकेरीत खडाजंगी सुरू झाली. दोघांचाही आवाज वाढला. त्यातच दिवसे चव्हाणांकडे गेले आणि त्यांना हाताला धरून कक्षाबाहेर नेऊ लागले. त्या वेळी दोघांत झटापट झाली. एकमेकांना शिवीगाळ सुरू झाली. त्याचवेळी दिवसे यांनी चव्हाण यांना मारहाण केली. या वेळी पारगे यांनी दिवसे यांना आवरले, तर इतर पोलिसांनी चव्हाण यांना बाहेर आणले. दरम्यान, पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके घटनास्थळी आले. त्यानंतर तातडीने चार पोलिसांनी चव्हाणांना उचलून पोलिस ठाण्यात नेले.
चव्हाण यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस व जनता दलाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर घोषणाबाजी केली. चव्हाण सनदशीर मार्गाने तहसीलदारांसमोर शांततेत भूमिका मांडत होते. तहसीलदारांचा कोणताही आदेश नसताना चव्हाणांचा आवाज दाबण्याच्या प्रयत्नातून दिवसे यांनी पूर्वीचा कोणता तरी राग डोक्यात घेत त्यांना मारहाण करून धमकी दिली आहे. या प्रकरणाच्या चौकशीअंती संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.
अमर चव्हाण यांचा शासकीय प्रक्रियेला अटकाव करण्याचा प्रयत्न होता. त्यांनी पोलिसांना ‘अरे-तुरे’ची भाषा वापरली. त्यांना दंगा करून प्रक्रिया बंद पाडायची होती. त्यांनी शिवीगाळ केल्याने पोलिस बळाचा योग्य वापर करीत तहसील कार्यालयातून बाहेर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मारहाण केलेली नाही.
- रोहित दिवसे, सहायक पोलिस निरीक्षक, गडहिंग्लज
अधिकाऱ्याची चौकशी करा!
आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सायंकाळी पोलिस उपअधीक्षक राजेश नवले यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74494 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..