कोरगांवकर’मध्ये गुणवंतांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरगांवकर’मध्ये गुणवंतांचा सत्कार
कोरगांवकर’मध्ये गुणवंतांचा सत्कार

कोरगांवकर’मध्ये गुणवंतांचा सत्कार

sakal_logo
By

33982
कोल्हापूर ः कोरगावकर हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, एम. एस. पाटोळे, संजय सौंदलगे, हसन देसाई आदी.

‘कोरगावकर’मध्ये गुणवंतांचा सत्कार
कोल्हापूर : येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलमध्ये शालांत परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव एम. एस. पाटोळे होते.
मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आर्यन वकीलकर, सारिका पुजारी, गौरी क्षीरसागर, सानिका लोखंडे, प्रीती चोपडे या विद्यार्थ्यांचा सत्कार चव्हाण, पाटोळे, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते हसन देसाई यांच्या हस्ते झाला. सिद्धी कपिलेश्वरी यांनी सूत्रसंचालन केले. वृषाली कुलकर्णी यांनी आभार मानले. वर्गशिक्षक रणधीर मिरजकर, प्रमिला साजणे, सतीश नंदनवार, सुरेखा पोवार यांनी संयोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74510 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..