रास्तभाव धान्य दुकानासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रास्तभाव धान्य दुकानासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत
रास्तभाव धान्य दुकानासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

रास्तभाव धान्य दुकानासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

sakal_logo
By

रास्तभाव दुकानासाठी
इच्छुकांनी अर्ज करावेत
जिल्हाधिकारी; शहरासह जिल्ह्यात २९ परवाने
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागासाठी एकूण २९ नवीन रास्तभाव धान्य दुकानांसाठी २०२२ चा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. इच्छुक संस्थांनी, महिला बचतगटांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी कागदपत्रांसह. ४ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
शहरात शिवाजी पेठ, शाहूपुरी, राजेंद्र नगर व रविवार पेठ. इचलकरंजी शहर- आर. के. नगर, इचलकरंजी. करवीर तालुका - मुडशिंगी, निगवे खालसा, नंदगाव, उजळाईवाडी व कोगील खुर्द. भुदरगड ः सालपेवाडी व बिद्री, पेठ शिवापूर. हातकणंगले ः पारगाव, यळगूड व कोरोची. राधानगरी ः सरवडे. कागल ः कागल शहर. चंदगड ः इसापूर, बेळेभाट, तडशिनहाळ व दाटे. शाहूवाडी ः आकुर्ले, मोळावडे, टेकोली व भेडसगाव. गगनबावडा ः अणदूर व तळीये बुद्रुक. पन्हाळा ः पोर्ले तर्फ बोरगाव व आजरा ः इटे येथे दुकान परवाने देण्यात येणार आहेत.
अर्जदार संस्थांनी अर्ज करण्यासाठी व माहितीसाठी संबंधित तहसील कार्यालय व शहर पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74530 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top