
पावसाने 5 लाखांच्या खासगी मालमत्तेचे नूकसान
खासगी मालमत्तेचे
५ लाखांचे नुकसान
पावसाचा दणका; खबरदारी घेण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार, तसेच दोन दिवसांपासून पावसात आतापर्यंत चारचाकी, घर, दुचाकी वाहन, भिंत कोसळणे, तसेच इतर १५ खासगी मालमत्तेचे तब्बल ५ लाख १९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, २८ जुलैपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी लागणार आहे.
जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात आठ ते दहा चारचाकी, पंधरा ते वीस दुचाकी, तसेच इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय, शंभरहून अधिक वृक्ष उन्मळून पडले. यापैकी अनेक झाडे घरांवर पडल्याने भिंती कोसळल्या. तसेच, वीस ते पंचवीस मालमत्ता धारकांच्या घरांचे पत्रे, शेड, गोठ्यांची पडझड झाली आहे. कोट्यवधीच्या मालमत्तेचे नुकसान झाले. दरम्यान, शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख १९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरात शाहूपुरी, राजारामपुरी, गंगावेस येथे वृक्ष पडून वाहनांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या घरांचा पंचनामा करून त्यांना मदत करण्याचे नियोजन सुरू आहे. पावसाळा सुरू होण्याआधीच जिल्ह्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी स्वत: नागरिकांनी खबरदारी घ्यावी लागणार आहे.
किरकोळ नुकसान
पक्क्या ३ घरांची अंशत: पडझड झाली आहे. कच्च्या ८ घरांची पडझड झाली आहे. त्यापैकी ६ घरे पात्र ठरली आहेत. २ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामध्ये फारसे नुकसान झाल्याची माहिती आलेली नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74542 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..