महापालिका आपत्ती व्यवस्थापन बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका आपत्ती व्यवस्थापन बैठक
महापालिका आपत्ती व्यवस्थापन बैठक

महापालिका आपत्ती व्यवस्थापन बैठक

sakal_logo
By

धोकादायक इमारतीतील
नागरिकांनी स्थलांतरित व्हावे

प्रशासक डॉ. बलकवडे; महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

कोल्हापूर, ता. ५ ः संततधार पावसामुळे धोकादायक इमारतीतील नागरिकांनी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून, पुराचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. निवडणूक कार्यालयात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेतली.
डॉ. बलकवडे म्हणाल्या, ‘नदीची पाणी पातळीत झपाटयाने वाढत असल्याने सर्व नियंत्रण अधिकारी व उप-शहर अभियंता यांनी ज्या ज्या भागात पाणी येते तेथे लक्ष ठेवावे. ज्या इमारती धोकादायक आहेत, परंतु मालक व कूळ वादामुळे कोर्टकेस सुरु आहे, अशा इमारतींमधील नागरिकांना तातडीने स्थलांतरित करावे.’
या नागरिकांनी स्थलांतरित होऊन निवारा केंद्रात यावे. यासाठी आजच उप-शहर अभियंता यांनी निवारा केंद्रांची पाहणी करुन त्या ठिकाणी आवश्यक त्या साहित्याची व्यवस्था कराव्यात. कुंभारगल्ली व मुक्तसैनिक वसाहत येथील गणेश मूर्ती स्थलांतरित कराव्या लागणार असतील तर त्याचे नियोजन करा. नाल्यातील काढलेला गाळ नाल्याकडेला असल्यास त्याचा उठाव करावा. धोकादायक वृक्ष छाटणीसाठी वॉर्ड वाईज चार पथके नेमण्याच्या सूचना उद्यान अधिकारी यांना दिल्या. महापालिकेच्या सर्व बोटी सज्ज ठेवा, रबरी बोटींत काही तांत्रिक बिघाड आहे का, ते तपासा. निवारा केंद्रासाठी वैद्यकीय पथके सज्ज ठेवा. परीख पूल येथे पुलाखाली पाणी साठू नये यासाठी या ठिकाणी मोटरपंप ठेवली आहे. त्याठिकाणी पाणी साठणार नाही याची काळजी घ्या. दैनंदिन पाण्याची पातळी पल्बिक अनाऊसमेंट सिस्टीमद्वारे नागरिकांना कळवा. अग्निशमन विभागाने सर्व संत्रणा सज्ज ठेवून आपत्ती कक्ष २४ तास सुरू ठेवावी. अशा सूचना उप-शहर अभियंता व मुख्‍य अग्निशमन अधिकारी यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औंधकर, संदीप घार्गे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तानाजी कवाळे, उपशहर अभियंता नारायण भोसले, एन. एस. पाटील, बाबूराव दबडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, पर्यावरण अभियंता समीर व्राघांबरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, स्टेशन ऑफिसर मनीष रणभिसे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74554 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top