मुसळधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुसळधार
मुसळधार

मुसळधार

sakal_logo
By

पंचगंगा पात्राबाहेर
० कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’
० मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
० ‘एनडीआरएफ’च्या दोन तुकड्या दाखल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळतच होता. गेल्या २४ तासांत पाणीपातळी तब्बल ११ फुटांनी वाढली. मध्यरात्री बाराच्या सुमारास पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. दरम्यान, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या स्थितीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यांनी थेट जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी संपर्क साधून आपत्ती व्यवस्थापनाची माहिती घेतली. ‘एनडीआरएफ’च्या दोन तुकड्या १० जुलैला कोल्हापुरात दाखल होणार होत्या, त्या आज रात्री दाखल झाल्या. जिल्ह्याचे नूतन पालक सचिव प्रवीण दराडे उद्या (ता. ६) जिल्हा दौऱ्यावर येत आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतील.
दरम्यान, पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. पावसाने उर्वरित पेरण्या आणि भात लागवड वेगाने होण्यास मदत होईल. भुईमूग, भात, सोयाबीन, कडधान्यासाठी पाऊस संजीवनी ठरला. शेतकरी चिंतामुक्त झाला आहे. आज सायंकाळी सातला राजाराम बंधाऱ्यापाशी पंचगंगेची पाणी पातळी २७.२ फुटांवर होती. गेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात तब्बल १९०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरड कोसळल्याने भुईबावडा घाट वाहतुकीसाठी बंद आहे. शिरोळ तालुक्यातील शिरढोणमार्गे कुरुंदवाड येथील रस्त्यावर पाणी आले. त्यामुळे तेथील वाहतूक बंद झाली. दरम्यान, राजाराम बंधाऱ्यासह जिल्ह्यात एकूण २३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ‘रेड अलर्ट’मुळे प्रशासनाचे नियोजन सुरू झाले आहे.
दरम्यान, पंचगंगा नदीघाटावरील मंदिरे तीन चतुर्थांश बुडाली आहेत. प्रशासनाने बॅरिकेड्‍स लावून घाटावर वाहनांना बंदी केली. दरम्यान, नदीपात्र पाहण्यासाठी छत्री घेऊन आलेल्या नागरिकांची गर्दी वाढताना दिसत होती.

असा झाला पाऊस
जिल्ह्यात आज सकाळी अकरापर्यंत संपलेल्या २४ तासांत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः हातकणंगले- २०.१, शिरोळ- ८.१, पन्हाळा- ६४.१, शाहूवाडी- ७५.६, राधानगरी- ८७.२, गगनबावडा- १९०.८, करवीर- ५२.५, कागल- ५८, गडहिंग्लज- २४.४, भुदरगड- ५९.८, आजरा- ३३.४, चंदगड- ३४.६.

दृष्टिक्षेपात
० राधानगरी धरणात ७५.०४ दलघमी पाणीसाठा, तर ११०० क्युसेक विसर्ग
० जिल्ह्यातील २३ बंधारे पाण्याखाली
० कोयना धरणातून १४ हजार १५२, अलमट्टी धरणातून १२ हजार ६८४ क्युसेक विसर्ग

धरण साठा (दशलक्ष घनमीटरमध्ये)
तुळशी ४०.८७, वारणा ३२४.३५, दूधगंगा २००.२, कासारी ३०.१६, कडवी २३.९८, कुंभी ३२.४६, पाटगाव ३९.३३, चिकोत्रा १९.४४, चित्री १७.४५, जंगमहट्टी १४.२१, घटप्रभा ३१.९७, जांबरे ८.८६, आंबेओहोळ १८.७९.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74579 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..