‘रवळनाथ’चे प्रधान कार्यालय सौर उर्जेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रवळनाथ’चे प्रधान कार्यालय सौर उर्जेवर
‘रवळनाथ’चे प्रधान कार्यालय सौर उर्जेवर

‘रवळनाथ’चे प्रधान कार्यालय सौर उर्जेवर

sakal_logo
By

34087
गडहिंग्लज : रवळनाथ प्रधान कार्यालयातील सौर उर्जा यंत्रणेचे उद्‍घाटन करताना संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले.


‘रवळनाथ’चे प्रधान
कार्यालय सौर ऊर्जेवर
१२ लाखांचा प्रकल्प; वर्षाला वीज बिलाचे दोन लाख वाचणार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ६ : श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीच्या गडहिंग्लज प्रधान कार्यालयाचे संपूर्ण कामकाज आता सौर ऊर्जेवर चालणार आहे. त्यासाठी १२ लाखांची सोलर सिस्टीम यंत्रणा बसविली आहे. या प्रकल्पामुळे दरवर्षी तब्बल दोन लाखाची बचत होणार आहे.
स्थापनेपासून बदलत्या काळानुसार संस्थेच्या कामकाजासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या ‘रवळनाथ’ने अपारंपरिक ऊर्जा व पैशाची बचत करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात संस्थेच्या प्रधान कार्यालयातून करण्यात आली.
येथील डॉक्टर कॉलनीतील संस्थेच्या प्रधान कार्यालयात बसविलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्‍घाटन संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या हस्ते झाले. या वेळी उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव, संचालक आर. एस. निळपणकर, प्रा. विजय आरबोळे, डॉ. संजय चौगुले, डॉ. दत्ता पाटील, महेश मजती, रेखा पोतदार, मीना रिंगणे, सीईओ डी. के. मायदेव, व्यवस्थापक शिवानंद घुगरे, प्रशासन अधिकारी सागर माने, जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड, अवधूत जोशी, जयंत हरळीकर उपस्थित होते.
-----------------
चौकट...
प्रतिदिन ७० युनिट वीजनिर्मिती
सौर ऊर्जेच्या निर्मितीसाठी संस्थेच्या छतावर ३१ पॅनेल बसविले आहेत. त्याची वीजनिर्मितीची एकूण क्षमता १८.४ किलो वॉट इतकी आहे. यामुळे सरासरी प्रतिदिनी ७० युनिट विजेची निर्मिती होईल. तयार होणारी वीज महावितरणला विकली जाणार असून महावितरणकडून प्रधान कार्यालयासाठी घेतल्या जाणाऱ्या विजेपेक्षा अतिरिक्त तयार होणाऱ्या विजेची रक्कम संस्थेच्या खात्यावर शिल्लक राहील. यामुळे प्रकल्पासाठी गुंतवलेली १२ लाख रुपये सहा वर्षांत वसूल होतील, असे चौगुले यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74640 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..