आजरा पश्‍चिम भागात रोप लावणीला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा पश्‍चिम भागात रोप लावणीला वेग
आजरा पश्‍चिम भागात रोप लावणीला वेग

आजरा पश्‍चिम भागात रोप लावणीला वेग

sakal_logo
By

33965
पेरणोली (ता. आजरा) ः रोपलावण करताना महिला.

आजरा पश्‍चिम भागात
रोप लावणीला वेग
पावसाची संततधार; उत्तूर, पूर्व भागात कोळपणी सुरू
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ६ : गेले दोन दिवस तालुक्यात पावसाची संततधार सुरू झाल्याने तालुक्याच्या पश्चिम भागात रोप लावणीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरी कुटुंबांनी शेतीत तळ ठोकला आहे. पावसामुळे पूर्व भाग व उत्तूर परिसरातील भात तरारले आहे. शेतकऱ्यांनी घात साधत भात व भुईमूग कोळपणीचे काम सुरू केले आहे. गत दोन दिवसांत तालुक्यात पावसाची संततधार सुरू राहिल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
जून महिना कोरडा गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पेरणी वाया जाण्याची शक्यता होती. दुबार पेरणीचे संकट उभा राहिले होते, पण आठ ते दहा दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले. भात चांगली तरारली आहेत. या दोन दिवसांत तर उसंत घेत संततधार पाऊस कोसळत आहे. यामुळे ओढे, नाले ओसांडून वाहत आहेत. हिरण्यकेशी व चित्रा नदी पात्रालगत वाहत असून, या दोनही नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. तालुक्यात भाताची नऊ हजार ८०० हेक्टर इतके क्षेत्र आहे. यामध्ये धूळवाफ व कुरीच्या पेरणीचे सुमारे सहा हजार हेक्टर क्षेत्र आहे. चार हजार हेक्टर क्षेत्र हे रोप लावणीचे आहे. यापैकी नदीकाठ व पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी रोपलावण सुरू आहे. गत दोन दिवसांत पावसाची संततधार सुरू असल्याने माळरान वगळता शिवार व गावाजवळ रोपलावणीला वेग आला आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास या महिनाभरात रोपलावणीचे काम संपेल, असे शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74664 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..