
डॉ. शिंदे इंजिनिअरिंगमध्ये रोजगार मेळाव्याला प्रतिसाद
34142
भडगाव : डॉ. ए. डी. शिंदे इंजिनिअरिंगध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात बोलताना प्राचार्य ए. एस. शेळके. व्यासपीठावर के. एस. जोशी, एस. डी. इंगळे व इतर.
डॉ. शिंदे इंजिनिअरिंगमध्ये
रोजगार मेळाव्याला प्रतिसाद
गडहिंग्लज, ता. ६ : भडगाव येथील डॉ. ए. डी. शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दिल्लीच्या गोल्ड प्लस या औद्योगिक क्षेत्रातील कंपनीकडून रोजगार मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात ३४५ हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील १२० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या मेळाव्यात मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या ३० पैकी १३, पॉलिटेक्निक मेकॅनिकलच्या ५० पैकी २५, आयटीआयच्या १५७ पैकी ४०, एचएससीच्या ३४ पैकी १९, बीबीएच्या ३५ पैकी १५ आणि बीएसस्सीच्या १३ विद्यार्थ्यांची निवड झाली. कणगला येथे कंपनीचा दक्षिण भारतातील प्रकल्प होत आहे. या प्रकल्पाला आवश्यक मनुष्यबळासाठी हा रोजगार मेळावा घेण्यात आला. लेखी परीक्षा आणि त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे या निवडी झाल्या.
निवड झालेल्यात डॉ. ए. डी. शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजचे अक्षय हुक्केरी, संदेश पाटील, सुमित बिरंजे, विक्रांत कुंभार, तसेच डॉ. ए. डी. शिंदे पॉलिटेक्निकचे शुभम भुजबळ, निखिल मुगळीहालकर, सतीश करगुप्पी, राहुल नाईक, रोहित पाटील, रोहित कापसे, श्रीधर चौगुले, अनिकेत साळुंखे, स्वप्नील शिंदे, विक्रांत पाटील, प्रल्हाद गावडे, रोहन रावल, ओंकार वाघे, आण्णासाहेब देसाई अशा १८ विद्यार्थ्यांची निवड झाली. संस्थाध्यक्ष श्रीपतराव शिंदे, सचिव प्रा. स्वाती कोरी, सल्लागार महेश कोरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कॅम्पस प्रक्रियेसाठी इंजिनिअरिंगचे प्र. प्राचार्य के. एस. जोशी, पॉलिटेक्निकचे प्राचार्य ए. एस. शेळके, ट्रेनिंग प्लेसमेंट हेड प्रा. एस. डी. इंगळे यांचे सहकार्य मिळाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74698 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..