एक लाखाची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक लाखाची चोरी
एक लाखाची चोरी

एक लाखाची चोरी

sakal_logo
By

शाहूपुरीत दुकानातून
लाखाची रोकड पळविली
कोल्हापूर ः शाहूपुरी कुंभार गल्लीतील लॅमिनेशनच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने ड्रॉव्हरमधील एक लाख रोकड पळविली. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी सांगितले, की आर. के. नगर परिसरातील विजय काळे यांचे शाहूपुरी कुंभार गल्लीत ‘श्री समर्थ लॅमिनेशन’चे दुकान आहे. दुकान त्यांनी काल रात्री बंद केले. दरम्यान चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून ड्रॉव्हर उचकटून काऊंटरमध्ये ठेवलेली एक लाख रोकड चोरून नेली. आज सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. काळे यांनी याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मेघा पाटील करीत आहेत.

कापड तागे चोरी; तिघांवर गुन्हा
इचलकरंजी : कारखान्यातील ६ लाख ६६ हजारांचे तयार तागे चोरणाऱ्या दोन कामगारांसह विकत घेणाऱ्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गणेश आरेनाड (जुना चंदूर रोड), नीलेश लोले (शाहूनगर, चंदूर), संदीप गुप्ता (इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. प्रत्येकी १३२ मीटर लांबीचे २२२ तागे चोरल्याची तक्रार आकाश अविनाश घाट यांनी पोलिस उपअधीक्षक कार्यालयात केली. शहापूर (ता. हातकणंगले) येथे तक्रारदार घाट यांचा कारखाना आहे. त्यांनी तयार कापड ताग्यांची मोजणी केली असता तागे चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. दोन्ही कामगारांनी कापड तागे घाट चोरून संदीप गुप्ता यांना विकले. याबाबत घाट यांनी येथील पोलिस उपअधीक्षक कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार ६ लाख ६६ हजार रुपये किमतीचे एकूण २२२ तागे चोरल्या प्रकरणी तिघांवर शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तडशिनहाळच्या एकावर ट्रक चोरीचा गुन्हा
चंदगड ः तडशिनहाळ (ता. चंदगड) येथील श्रीनाथ रघुनाथ पाटील याच्यावर येथील पोलिसांत ट्रक चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. संशयीत पाटील हा २२ जूनला बेकायदेशीरपणे ट्रकमधून (एमएच ४५ एएफ १४५७) वाळू वाहतूक करीत असल्याचे आढळले होते. तलाठी गणेश रहाटे यांनी त्याच्यावर कारवाई करून ट्रक ताब्यात घेऊन तो तहसील कार्यालयाच्या आवारत लावून त्याची चावी गौण खनिज विभागाच्या महसूल सहाय्यकांकडे दिली होती. दरम्यान पाटील याला अनधिकृत वाळू वाहतूक प्रकरणी दंडाची नोटीस पाठवली होती; परंतु दंडाची रक्कम न भरता आणि तहसीलदारांची संमती न घेता त्याने ट्रक चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हेड कॉन्स्टेबल जमीर मकानदार तपास करीत आहेत.

कुंभोजमध्ये तरुणावर हल्ला
कुंभोजमध्ये हातकणंगले ः कुंभोज (ता. हातकणंगले) येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या किरकोळ वादातून झालेल्या चाकू हल्ल्यात तरुण जखमी झाला. उमेश राजाराम आरगे (वय २८) असे त्यांचे नाव आहे. कुंभोज येथील मिरवणुकीमध्ये विजय नामे (वय ५०) व उमेश राजाराम आरगे यांचा किरकोळ वाद झाला होता. याच रागातून विजय नामे यांचा मुलगा अशुतोष विजय नामे याने उमेश आरगे याच्या सव्हिीसिंग सेंटरमध्ये त्याच्यावर चाकू हल्ला केला. यात आरगे याच्या डाव्या हाताला जखम झाली. शेजारील लोकांनी कोल्हापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचा जवाब उमेश आरगे याने हातकणंगले पोलिसांत दिला असून अधिक तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत.

01713
कुमरीत युवकाची आत्महत्या
नेसरी : कुमरी (ता. गडहिंग्लज) येथील युवक शशिकांत संजय पाटील (वय २१) यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबतची वर्दी लक्ष्मण कृष्णा मुंगुरकर यांनी नेसरी पोलिस ठाण्यात दिली आहे. शशिकांत याने अज्ञात कारणावरून राहत्या घरात तिसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तपास पोलीस नाईक अंजली पाटील करत आहेत.

सुभाषनगरातील वृद्धाचा मृत्यू
कोल्हापूर ः दुकानात खरेदीसाठी गेलेल्या वृद्धाचा दुचाकी घसरून पडल्याने जखमी झाली. सीपीआरमध्ये त्यांचा आज मृत्यू झाला. नजीर इमामसो मुल्ला (वय ६३, सुभाषनगर) असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, मुल्ला हे काल रात्री नऊच्या सुमारास चॉकलेट आणण्यासाठी दुचाकीवरून दुकानाकडे जात होते. त्या वेळी त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला. त्यात ते जखमी झाले. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. त्यांचा उपचार सुरू असताना मध्यरात्री मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74723 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..