शासकीय कार्यालयांच्या छतांना गळती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय कार्यालयांच्या छतांना गळती
शासकीय कार्यालयांच्या छतांना गळती

शासकीय कार्यालयांच्या छतांना गळती

sakal_logo
By

34167
34168
34169
-------
शासकीय कार्यालयांच्या छतांना गळती
प्लास्टिक झाकून महत्त्वाचे दस्ताऐवज न भिजण्यासाठी धडपड; दुरुस्तीकडे दुर्लक्ष
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ६ : पावसाने जोर धरल्याने पूरग्रस्तांसोबत शहरातील शासकीय कार्यालये भीतीच्या छायेखाली आली आहेत; मात्र शासकीय कार्यालयांना संभाव्य पुराच्या पाण्याची भीती नसून कार्यालयाच्या छतामधून ठिपकणाऱ्‍या पावसाच्या पाण्याची भीती सतावत आहे. कार्यालयामधील महत्त्वाचे दस्तावेज भिजून खराब होऊ नये यासाठी प्लास्टिक कागदाने झाकून ठेवण्याची धडपड करताना अधिकारी, कर्मचारी दिसत आहेत. याबाबत शासकीय कार्यालयाकडून महापालिकेकडे वेळोवेळी तक्रारी होऊनही आवश्यक दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
इचलकरंजी शहरात प्रांताधिकारी, अपर तहसील, मंडल अधिकारी, तलाठी, दुय्यम निबंधक, सहायक कामगार आयुक्त, वस्त्र कमिटी, नगरभूमापन आदी शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयामध्ये शहर व परिसरातील कोरोची, कबनूर, तारदाळ, चंदूर, खोतवाडी, रेंदाळ, हुपरी, साजणी आदींसह अन्य ग्रामीण भागातील कामकाज चालते. त्यामुळे ही कार्यालये अधिकतर वेळी गजबजलेली असतात.
उन्हाळा, हिवाळ्यामध्ये येथे येणाऱ्‍या नागरिकांना व अधिकाऱ्‍यांना कार्यालयाच्या ‍अपुऱ्या जागेची समस्या जाणवते, मात्र पावसामध्ये छतातून पडणाऱ्‍या पाण्यांमधून स्वत:ला सुरक्षित ठेवायचे की कार्यालयात असलेल्या दस्ताऐवजांना, हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. याहून अधिक त्रास येथे कामानिमित्त येणाऱ्‍या ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यांना या कार्यालयाच्या दारामध्ये भिजत उभे राहावे लागत आहे.
शहरात असलेली अधिकतर शासकीय कार्यालये ही महानगरपालिकेची मालकी असलेल्या वास्तुंमध्ये भाडे तत्त्वावर आहेत. या शासकीय कार्यालयांकडून दरवर्षी सुमारे १६ लाख ७५ हजार रुपयांची भाडेपट्टी महापालिका प्रशासनास देण्यात येते. त्यामुळे या कार्यालयामधील अधिकाऱ्‍यांनी दुरुस्तीसाठी वेळोवेळी तक्रार करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी अनेक कार्यालये अन्य जागांचा शोध घेण्याच्या तयारीत आहेत.
----------
पावसाळ्यामध्ये कार्यालयच्या होणाऱ्या दुरवस्थेबाबत पालिका प्रशासनास सुमारे वीस ते तीस वेळा तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर केवळ एकदा कर्मचाऱ्‍यांना पाठवून दुरुस्ती केली, मात्र या दुरुस्तीने गळती थांबली नसून सुरूच आहे. कार्यालयामधील दस्ताऐवज पाण्यापासून सुरक्षित ठेवताना आमची तारांबळ उडत असते. जलद दुरुस्तीची आवश्यकता आहे.
-अधिकारी, वस्त्र कमिटी कार्यालय
------------------
शासकीय कार्यालये वार्षिक भाडे दृष्टिक्षेप
---
कार्यालयाचे नाव* ठिकाण* वार्षिक भाडे
दुय्यम निबंधक* गोविंदराव हायस्कूल व राजाराम स्टेडियम* ४६०००
ईएसआय दवाखाना* यशवंत प्रोसेस* ६५५२०
कामगार कार्यालय* राजाराम स्टेडियम* ३८४८०
उत्पादन शुल्क* भगतसिंह उद्यान* २१६०००
दिवाणी न्यायाधीश* डॉ.आंबेडकर हॉस्पिटल* ८२१९४०

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74740 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..