डेंगी मेन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगी मेन
डेंगी मेन

डेंगी मेन

sakal_logo
By

डेंगी डास फोटो

शहर, जिल्ह्यात डेंगीची धास्ती
महिन्याभरात सापडले ४५ रुग्ण; डेंगीसदृश आजाराने शेकडो रुग्ण त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः शहरासह जिल्ह्यात डेंगीसदृश आजाराची लाट आहे. घराघरांत ताप तसेच ‘प्लेटलेस'' कमी झालेले रुग्ण संख्या वाढत आहे. असे डेंगीसदृश शेकडो रुग्ण खासगी व शासकीय दवाखान्यात उपचार घेत आहेत. महिन्याभरात शहरात २२ तर जिल्ह्यात २३ व्यक्तींना डेंगी झाल्याचे निदान झाले आहे.
पावसाळी वातावरणात अनेकांची प्रकृती बिघडली. अनेकांना ताप, सांधेदुखी झाली. सोबत प्लेटलेस कमी होणे, प्रमाण वाढले,अशी लक्षणे अंगावर काढून उशिरा दवाखान्यात येणाऱ्याचे प्रमाण अधिक आहे. यात गंभीर रुग्णांना ॲडमीट केले जाते. शासकीय रुग्णालयात रोज १० ते २० रुग्ण उपचाराला येतात. यातील तीन-चार रुग्ण डेंगीचे आहेत तर उर्वरित डेंगीसदृश आजारांचे आहेत. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याची गरज आहे. अशी अपेक्षा वैद्यकीय यंत्रणेकडून व्यक्त होत आहे.
जिल्हा हिवताप नियंत्रण विभागाचे अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी सांगितले, डेंगी व चिकनगुण्‍याची लक्षणे सारखी आहेत. हे दोन्ही आजार डासांपासून होतात. पावसाळ्यात डासांची पैदास वाढते. यातील इजिप्त इडीस हा डास चावला तर त्यांच्यापासून डेंगीचा प्रादुर्भाव होतो. ज्या भागात डास अंडी घालतात, त्यांची पैदास वाढते. त्या भागात डेंगीचे रुग्ण वाढू शकतात. जिल्ह्यात ग्रामीण व शहरात विशेषतः ज्या भागात दलदल आहे किंवा पाण्याचा जुना साठा असतो. तिथे असे डास तयार होतात. त्यामुळे ग्रामपंचायत व महापालिकेला परिसर स्वच्छता करण्याचे लेखी पत्रे दिले आहे. घराघरांत सर्वेक्षणही सुरू आहे.
--
शहरातील डेंगीचे हॉटस्पॉट
*आर.के.नगर * पाचगाव * मोरेवाडी * राजेंद्रनगर * सदरबझार * कदमवाडी * लक्षतीर्थ वसाहत * शिवाजी पेठ
*या भागात डेंगीचे दहापेक्षा अधिक रुग्ण सापडले तर अन्य भागात १० रुग्ण आहेत
*शहरात एकूण २२ डेंगीचे रुग्ण सापडले

डेंगीची लक्षणे -
*डोळ्याच्या खोबणीत दुखणे
*ताप येतो, डोखे दुखी मळमळ होते
* थकवा येतो, उलटी होणे, चक्कर येणे.
-----------
चिकनगुण्‍या लक्षणे
* ताप एकदा येऊन जातो पुढे सांधेदुखी

अशी घ्या खबरदारी
हिवताप नियंत्रण विभागाचे अधिकारी डॉ. खटावकर म्हणाले, ‘‘जुनी भांडी, कुंड्या, टायर, नारळ करंवट्या, फ्रीजच्या प्लेटमधील पाणी, एसीचे पाणी, कंटेनर यातील पाण्यात डास कोष तयार होतात. त्यातून डेंगीचा डास जन्माला येतो. असे पाणी साठणार नाही, ते ही सात दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवू नये, याची काळजी घ्यावी. त्यासाठी घरातील व अवतीभोवतीचे पाणी आठवड्यातून बदलावे. घराघरांत एक दिवस कोरडा पाळावा, दलदलीवर औषध फवारणी किंवा जळके ऑईल टाकावे.

असा आहे डेंगीचा फरक
एनएस-१ ही चाचणी पॉझिटिव्ह आली तर तो डेंगी म्हणता येत नाही, मात्र खासगी रुग्णालयात ही टेस्ट डेंगी पॉझिटिव्ह धरली जाते. मात्र व्हायरल इन्फेक्शनमध्ये
ही चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकते. म्हणून डेंगीचे लक्षणे असणाऱ्यांची ‘आयजीएम'', ‘आयजीजी’ या दोन चाचण्या पॉझिटिव्ह आल्या तरच डेंगी असल्याचे गृहीत धरले जाते, शासकीय रुग्णालयातही या दोन्ही चाचण्या होतात, असेही डॉ. खटावकर यांनी सांगितले.

कोट
डेंगी सदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. तर डेंगी झालेली रोज एक-दोन रुग्ण सापडत आहेत. कोणतेही लक्षण दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे वेळीच उपचार केल्यास डेंगी १०० टक्के बरा होतो. रुग्णांनी लक्षणे अंगावर काढू नयेत.
- डॉ. उमेश कदम, अधीक्षक, सेवा रुग्णालय

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74794 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top