इचल ः संक्षिप्त आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल ः संक्षिप्त आवश्यक
इचल ः संक्षिप्त आवश्यक

इचल ः संक्षिप्त आवश्यक

sakal_logo
By

01651
मालेत बाळूमामा पालखी सोहळा
बोरपाडळे : पन्हाळागड एज्युकेशन अँड स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स संचलित मालेतील ज्‍योर्तिलिंग पब्लिक स्कूलच्या परिसरामध्ये संत सद्‌गुरु बाळूमामा यांचा पालखी सोहळा झाला. तीन दिवस मुक्कामी सोहळ्यात अनेक धार्मिक कार्यक्रम झाले. भंडाऱ्याची उधळण करत जयघोषात पालखीचे स्वागत झाले. बाजार समितीचे माजी संचालक कृष्णा चव्हाण यांनी महाप्रसाद वाटप केला. पालखीबरोबर सेवेकऱ्यांच्या मुक्कामाची व मेंढरे बांधण्यासाठी शाळेच्या पटांगणात सोय केली होती. चहापान, नाष्टा व जेवणाची सोय शाळा व्यवस्थापनने केली होती. ज्योर्तिलिंग पब्लिक स्कूलचे संस्थापक व अध्यक्ष शिवलिंग कळंत्रे, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. कळंत्रे, शिक्षक व कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

२७०१
कौलवमध्ये अंगणवाडीला साहित्य
शाहूनगर ः एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कौलव (ता. राधानगरी) येथे बांधलेल्या अंगणवाडी इमारतीचे उद्‌घाटन शोभा चौगले व राधानगरीचे काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील कौलवकर यांच्या हस्ते झाले. ग्रामपंचायतीने अंगणवाडीत बोलक्या भिंती व खेळाचे साहित्य दिले. सरपंच सविता चरापले, उपसरपंच रूपाली परीट, तंटामुक्तीचे अध्यक्ष विजय पाटील, स्नेहा पाटील, नम्रता पाटील, वृषाली पाटोळे, सारिका सोनाळकर, डी. जी. पाटील, एम. डी. सुतार, सदाशिव लोहार, गणेश मोरे, दीपक चरापले, प्रा. डॉ. विश्वास पाटील, प्रा. अशोक पाटोळे, ए. के. चौगले, शंकर परीट, आर. जी. चरापले उपस्थित होते. ग्रामसेवक पी. एस. आरडे यांनी प्रास्ताविक केले. सागर पाटील यांनी आभार मानले.

३७०४
‘काळम्मा’च्या अध्यक्षपदी देसाई
कोनवडे ः मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथील काळम्मा विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी रणजित राजाराम देसाई यांची, तर उपाध्यक्षपदी अशोक तुकाराम पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वाय. बी. खाडे यांनी काम पाहिले. माजी जि. प. सदस्य आर. व्ही. देसाई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया झाली. नूतन संचालक सुरेश नलवडे, केदारी आडके, बाजीराव देसाई, दत्तात्रय देसाई, भिवाजी देसाई, नारायण सुतार, ज्ञानदेव परिट, रणजित कांबळे, अर्चना देसाई, शालन खेगडे उपस्थित होते. आभार संस्था सचिव दत्तात्रय खतकर यांनी मानले.

उमाजी पवार अध्यक्षपदी
सिद्धनेर्ली ः शेंडूर (ता. कागल) येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी उमाजी पवार यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी अस्मिता करपे यांची बिनविरोध निवड झाली. शाळा समितीच्या अन्य सदस्य असे ः प्रवीण तुकाराम पवार, संतोष आनंदा पवार, जमीर मिरासो नायकवडी, सागर विठ्ठल चव्हाण, विलास संदीप करपे, गीता नागरगोजे.

02332
मौनी विद्यापीठात ‘एक कॅडेट, एक झाड’
गारगोटी : येथील मौनी विद्यापीठात कृषी दिन कार्यक्रम झाला. यानिमित्त कर्मवीर हिरे महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या वतीने कॅप्टन अरविंद चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक कॅडेट, एक झाड’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण केले. विद्यापीठ परिसरात सर्वांनी औषधी वनस्पतींची लागवड करून त्याच्या संगोपनाची शपथ घेतली. या वेळी कॅप्टन अरविंद चौगले, उपप्राचार्य डी. ए. कांबळे, प्रा. सचिन चौगले, प्रा. राजेंद्र देसाई, प्रा. एस. बी. केणे, प्रा. एस. डी. राजरत्न यांच्यासह एनसीसी कॅडेटस् उपस्थित होते.

गटविकास अधिकारी बघेंचे स्वागत
बांबवडे ः शाहूवाडी तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी कटीबद्ध असेन, असे प्रतिपादन नवनियुक्त गटविकास अधिकारी रामदास बघे यांनी केले. श्री. बघे यांचे ग्राहक पंचायततर्फे स्वागत केले याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘तालुक्यातील वाड्या वस्त्यां व गावे प्रगत करण्यासाठी शिक्षक, डॉक्टर, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवकांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागरिक व शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना सक्षमपणे राबवण्यासाठी प्रयत्न करेन.’’ जिल्हा संघटक जगन्नाथ जोशी, तालुकाध्यक्ष अमर पाटील, उपाध्यक्ष नंदकुमार जामदार, संघटक मंत्री डॉ. संजय मगदूम, सचिव उत्तम गुरव, रामकृष्ण सातपुते, शैलेश चोरगे, पानवखिंड पतसंस्थेचे सचिव विजय पाटील उपस्थित होते. अमर पाटील स्वागत तर आभार नंदकुमार जामदार यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74801 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..