मुक्त चिंतन पुस्तकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुक्त चिंतन पुस्तकाचे प्रकाशन
मुक्त चिंतन पुस्तकाचे प्रकाशन

मुक्त चिंतन पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By

34241
कोल्हापूर : ईश सेवा संस्थेतर्फे श्री सिद्धगिरी रुग्णालयास रुग्णवाहिका प्रदान करताना उपस्थित मान्यवर.

ईश सेवा संस्थेतर्फे कार्यक्रम
कोल्हापूर, ता. ६ : नाथ संप्रदायी पावस निवासी स्वामी स्वरुपानंदांच्या मानसकन्या यमुताई कुलकर्णी (स्वरुपसुकन्या) गुरुमाऊली यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यमुताई कुलकर्णी लिखित ‘मुक्तचिंतन’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सुधीर फडके यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी, यमुताईंच्या जीवनावरील लघुपट दाखविला. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात कार्यक्रम झाला. स्वामी स्वरुपानंदकृत ‘संजीवनी गाथेतील अभंग’ प्रसारण सिद्धगिरी मठाचे काडसिद्धेश्‍वर स्वामी यांच्या हस्ते झाले. ईश सेवा संस्थेने आयोजन केले. सिद्धगिरी रुग्णालयाला रुग्णवाहिका प्रदान केली.
डॉ. फडके म्हणाले, ‘‘मुक्तचिंतन हे पुस्तक दिपस्तंभासारखे आहे. त्यात यमुताईंच्या जीवनातील घटनाक्रम, साधना प्रसंग आहेत. हे पुस्तक प्रत्येक गुरुभक्ताने वाचन करावे. यातून साधना कशी करावी, हे समजू शकेल. यमुताईंच्या जीवनातील कोणताही प्रसंग असो, त्याला स्वामी स्वरुपानंदाची बैठक होती. स्वामींचा हा भाव प्रत्येक पानोपानी दिसून येईल. यमुताईंचे हे मुक्तचिंतन जीवनाला आधार होईल, असे आहे.’’ पावस येथील विजयराव देसाई म्हणाले, ‘‘यमुताईं यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. यानिमित्त या पुस्तकाचा प्रचार, प्रसार करवा. जेणेकरुन जिज्ञासू लोकांना फायदा होईल.’’ सुधीर ढवळीकर, अमरेंद्र कामत, मिलींद जोग उपस्थित होते.
प्रसन्न घाणेकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे विश्‍वस्त डॉ. मानसिंग निकम यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74812 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..