
फसवणूक
‘वीज बिल कट’द्वारे
९९ हजारांची फसवणूक
भामट्याचे कृत्य; एमएसईबीतून बोलत असल्याची बतावणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः एमएसईबीमधून बोलत असल्याची बतावणी करून भामट्याने मोबाईल ॲप्लिकेशनच्या आधारे ९९ हजारांहून अधिकची फसवणूक केली. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली.
पोलिसांनी सांगितले, अमेय भोगले कोल्हापुरात राहतात. ते घरातील सर्व बिले ऑनलाईन भरतात. त्यांच्या नातेवाइकांच्या मोबाईलवर एका क्रमांकावरून सोमवारी (ता. ४) सायंकाळी संदेश प्राप्त झाला. ‘प्रिय ग्राहक तुमचे विद्युत कनेक्शन रात्री काढून टाकण्यात येईल. कारण आपण चालू बिल अपडेट केलेले नाही. कृपया तुम्ही अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा. असा तो संदेश होता. त्यानुसार संबंधित नातेवाइकांनी त्या मोबाईल क्रमांकावर फोन लावून तो भोगले यांना बोलण्यास दिला. समोरच्या व्यक्तीने त्याचे नाव ‘शर्मा’ असे सांगितले. त्याने विद्युत बिल भरण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून त्यांना एक ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्याआधारे भामट्याने दोन वेगवेगळ्या बँक खात्यांतून ९९ हजार १०० रुपये परस्पर वर्ग करून फसवणूक केल्याची फिर्याद भोगले यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. हा गुन्हा पुढील तपासासाठी सायबर पोलिस ठाण्याकडे वर्ग केला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74861 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..