वाहतूक नियमभंग कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक नियमभंग कारवाई
वाहतूक नियमभंग कारवाई

वाहतूक नियमभंग कारवाई

sakal_logo
By

वाहतूक नियमांचे उल्लंघन
---
४१० जणांवर कारवाई; दोन लाख १६ हजारांचा दंड वसूल
कोल्हापूर, ता. ६ ः एकेरी मार्गावरून प्रवास करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४१० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून दोन लाख १६ हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला.
वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी, या उद्देशाने वाहनांसाठी शहरातील ३१ मार्ग एकेरी करण्यात आले आहेत. यासंदर्भात नागरिकांच्या सूचना आणि हरकतीही मागविल्या होत्या. त्याला नागरिकांनी समर्थन दर्शविले असल्याने ते एकेरी मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. काही वाहनधारक एकेरी मार्गात प्रवेश करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आले. यासंबंधी आज पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाईची मोहीम राबवली. दिवसभरात ४१० वाहनांवर कारवाई केली.

चौकट

कारवाई- ४१०
दंड वसूल- १७ हजार ५००
अनपेड दंड- १ लाख ९८ हजार ५००

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74892 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..