बालिका मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालिका मृत्यू
बालिका मृत्यू

बालिका मृत्यू

sakal_logo
By

३४२७१

कदमवाडीतील
बालिकेचा मृत्यू
---
पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः कदमवाडी येथील दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्‍यू झाला. श्रीषा सागर मालगावे असे तिचे नाव आहे. या बालिकेला भोसलेवाडी येथील महापालिका आरोग्य केंद्रात लसीकरण केल्यावर काही काळातच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांनी लसीकरणाविषयी शंका उपस्थित करून शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिस ठाण्यात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः श्रीषाला सोमवारी भोसलेवाडी येथील महापालिका आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नेले होते. तेथे तिला लस दिली. काही वेळाने तिच्या अंगावर फोड येऊ लागले. त्यानंतर तिला पुन्हा रुग्णालयात नेले. त्यानंतर ती आज बेशुद्ध झाली. तिचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी लसीकरणाबाबत शंका उपस्थित केली. तसेच, शवविच्छेदनही झाले. याबाबत नातेवाईकांनी रीतसर तक्रार दिली.
दरम्यान, महापालिका आरोग्य विभागानेही याची गंभीर दखल घेतली असून, अन्य केंद्रांवरील बालकांचे लसीकरण थांबविल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

या प्रकरणाची माहिती लसीकरण अधिकाऱ्यांनी दिल्यावर वरिष्ठांना माहिती दिली. त्या केंद्रावरून इतर बालकांनाही लस दिली आहे. इतरांना दुष्परिणाम जाणवलेले नाहीत. तरीही त्या बॅचमधील पाठवलेली लस शहरातील ११ आरोग्य केंद्रांवरही द्यायची थांबवली. लस तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवली आहे. महापालिकेच्या तज्ज्ञ समितीची बैठक घेण्यात येणार असून, या विषयावर चर्चा केली जाणार आहे.
- डॉ. प्रकाश पावरा, आरोग्याधिकारी, महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74907 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..