ओबीसी आरक्षणानंतरच सार्वत्रिक निवडणूका घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसी आरक्षणानंतरच सार्वत्रिक निवडणूका घ्या
ओबीसी आरक्षणानंतरच सार्वत्रिक निवडणूका घ्या

ओबीसी आरक्षणानंतरच सार्वत्रिक निवडणूका घ्या

sakal_logo
By

34500
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अभिनंदन करताना माजी उपगराध्यक्ष तानाजी पोवार, रवी रजपूते.


ओबीसी आरक्षणानंतरच
सार्वत्रिक निवडणुका घ्या
तानाजी पोवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
इचलकरंजी, ता. १० : ओबीसी आरक्षण मंजुरीनंतरच स्थानिक स्वराज संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका घ्या, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची मंत्रालयात भेट घेऊन पोवार व रजपूते यांनी त्यांचे अभिनंदन केले. इचलकरंजी महापालिका करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल शिंदे यांचे त्यांनी आभार मानले.
आगामी महापालिका, राज्यातील पालिका, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घ्याव्यात, अशी पोवार यांनी मागणी केली. पालिकांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांची लाड समितीच्या शिफारसीनुसार नियुक्ती करण्यात येते. पण सध्या केवळ अनुसूचित जातीसाठीच याचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे अन्य प्रवर्गांतील कर्मचाऱ्यांना हा लाभ देण्याचे बंद केले आहे. त्यामुळे हक्काची मिळणारी नोकरी असतानाही शासनाने बदललेल्या नियमामुळे वंचित राहावे लागत आहे, याकडे पोवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष वेधले. पूर्वीप्रमाणे सर्वच जातींच्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना याचा लाभ द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन पोवार व रजपूते यांनी चर्चा केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75284 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top