कानूरच्या भावेश्‍वरी संस्थेची शंभर टक्के कर्ज वसूली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कानूरच्या भावेश्‍वरी संस्थेची शंभर टक्के कर्ज वसूली
कानूरच्या भावेश्‍वरी संस्थेची शंभर टक्के कर्ज वसूली

कानूरच्या भावेश्‍वरी संस्थेची शंभर टक्के कर्ज वसूली

sakal_logo
By

कानूरच्या भावेश्‍वरी संस्थेची
शंभर टक्के कर्ज वसुली
चंदगड, ता. ८ ः कानूर बुद्रुक (ता. चंदगड) येथील श्री भावेश्‍वरी विकास सेवा संस्थेने ३० जूनपूर्वी संस्था पातळीवरील शंभर टक्के कर्ज वसुली केली आहे. जिल्हा बॅंकेच्या कानूर खुर्द शाखेमध्ये कर्जाचा संपूर्ण भरणा करणारी या विभागातील ही पहिली संस्था ठरली आहे. संस्थेचे संस्थापक धैर्यसिंग सावंत- भोसले यांनी ही माहिती दिली. तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना शेतीविषयक कामकाजासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या या संस्थेने सुरवातीपासूनच पारदर्शी कारभारातून आपला ठसा उमटवला आहे. गरजेच्या वेळेला कर्जाचे वितरण आणि त्याची शंभर टक्के वसुली ही परंपरा आहे. अध्यक्ष गोविंद गुडूळकर, उपाध्यक्ष चंद्रकांत गावडे, संचालक अशोक मटकर, सातू मासरणकर, सुरेश नाईक, कृष्णा नाईक, लक्ष्मण देसाई, निंगूबाई नाईक, लक्ष्मी साबळे, धोंडिबा गुडूळकर यांच्यासह कृष्णा मासरणकर, विश्‍वनाथ कुडतरकर, सूर्यकुमार सावंत भोसले, लक्ष्मण गुरव, जिल्हा बॅंकेचे निरीक्षक अमंगी, विकास अधिकारी पाटील, शाखा अध्यक्ष बाळू गावडे, कॅशिअर देसाई, पुंडलिक बोलके, तानाजी नाईक यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे सचिव सटुप्पा गावडे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75318 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..