जांबरे प्रकल्प भरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जांबरे प्रकल्प भरला
जांबरे प्रकल्प भरला

जांबरे प्रकल्प भरला

sakal_logo
By

३४५५०
जांबरे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला
चंदगड, ता. ८ ः जांबरे (ता. चंदगड) मध्यम प्रकल्प गुरुवारी (ता. ७) रात्री अकरा वाजता पूर्ण क्षमतेने भरला. सध्‍या सांडव्यातून ८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. फाटकवाडी (ता. चंदगड) प्रकल्पापाठोपाठ तालुक्यातील हा दुसरा प्रकल्प पू्र्ण क्षमतेने भरला आहे. सध्‍या या प्रकल्पामध्ये २३.२३ दशलक्ष घन मीटर म्हणजे क्षमतेच्या शंभर टक्के पाणी साठा आहे. पाण्याची पातळी ७३७ मीटर आहे. धरणक्षेत्रात १ जूनपासून ८३२ मिमी. पाऊस झाला असून गेल्या चोवीस तासात १५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. अजूनही या भागात जोरदार पाऊस सुरूच आहे. दरम्यान घटप्रभा नदीवर आधारित फाटकवाडी प्रकल्प आणि ताम्रपर्णी नदीवर आधारीत जांबरे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आता प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणी या दोन्ही नद्यांच्या पात्रात येत असल्याने नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. यापुढे अतिवृष्टी झाल्यास पुराचा धोका संभवतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.


०१५५५

नागणवाडीत १५.३३ टक्के साठा
पिंपळगाव, ता. ८ ः भुदरगड तालुक्यातील बारवे-दिंडेवाडी हद्दीतील नागणवाडी प्रकल्प १५.३३% भरला आहे. प्रकल्प क्षेत्रात सलग संततधार सुरू असून या प्रकल्पात पाणी साठत आहे. गेली पंचवीस वर्षे काम रखडलेल्या या प्रकल्पात पाणीसाठा सुरू झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यातून आनंद व्यक्त होत आहे. आमदार प्रकाशराव आबिटकर यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेला असून या शापीत परिसराच्या हरितक्रांतीला सुरुवात होत आहे. या वर्षी पहिल्यांदा या प्रकल्पात पाणीसाठा होत आहे.

कुंभी प्रकल्पात
५०.६६ टक्के साठा
गगनबावडा ः शुक्रवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात कुंभी धरण पाणलोट क्षेत्रात शासकीय पर्जन्यमापक यंत्राप्रमाणे १४० मि.मी. तर तालुक्यात आजअखेर सरासरी १०७४ मि. मी. पाऊस झाला आहे. कुंभी धरण क्षेत्रात १५३ मि.मी. पाऊस झाला असून आजअखेर धरण क्षेत्रात एकूण १६०४ मि.मी. पाऊस झाला. कुंभी धरणात ३८.९५ दलघमी. साठा असून संचय क्षमतेच्या ५०.६६ टक्के भरले आहे. धरणातून ३०० क्युसेक विसर्ग कुंभी नदी पात्रात चालू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75319 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..